
रत्नागिरी- संक्षिप्त
rat०३५. txt
(पान ५ साठी, संक्षिप्त)
ग्राहक पंचायतीची आज सभा
रत्नागिरी ः. ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेची रत्नागिरी शाखा स्थापनेसाठी उद्या (ता. ४) सकाळी ११ वा. रा. भा. शिर्के प्रशालेत सभा आयोजित केली आहे. भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे संस्थापक ग्राहकतीर्थ स्व. बिंदुमाधव जोशी स्थापित ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या माध्यमातून राज्यातील २२ जिल्ह्यात ग्राहक जागृतीचे कार्य सुरू आहे. ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे कार्य कोकण विभागातील जिल्ह्यांमध्ये पोचवण्याच्यादृष्टीने जिल्हा तेथे संस्थेची शाखा स्थापनेसाठी प्रयत्न सुरू आहेत. सभेला संस्थेचे राज्य सदस्य व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा. एस. एन. पाटील व सचिव संदेश तुळसणकर उपस्थित राहणार आहेत. सर्वांनी सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरीचे प्रतिनिधी विलास घाडीगांवकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संदेश सावंत यांच्याशी संपर्क साधावा, असे संस्थेतर्फे कळवण्यात आले आहे.
फोटो ओळी
-rat३p५.jpg ः
६६२१९
लांजा ः शिरवली वरचीवाडी येथे विजय बंधारा बांधण्यात आला.
शिरवली गावात विजय बंधारा
लांजा ः तालुक्यातील शिरवली गावात वरचीवाडी येथे विजय बंधारा बांधून पूर्ण करण्यात आला आहे. हा बंधाऱ्या बांधण्यामध्ये ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, ग्रामस्थ व महिलावर्ग सहभागी झाले होते. पाणी हे जीवन आहे आणि दिवसेंदिवस होणारी तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता गावागावांमध्ये असणाऱ्या वहाळांवर बंधारे बांधून ''पाणी अडवा पाणी जिरवा'' मोहीम यशस्वी करणे गरजेचे आहे. याच हेतूने हा विजय बंधारा वरचीवाडी येथील वहाळावर बांधण्यात आला. या बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग हा येथील ग्रामस्थांना कपडे, भांडी धुणे यासाठी होणार असून शेतकऱ्यांची पाळीव जनावरे तसेच पशुपक्ष्यांनादेखील या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी होणार आहे. येथील शेतकऱ्यांना उन्हाळी शेती करण्यासाठीदेखील या पाण्याचा वापर करता येणार आहे. हा बंधारा बांधण्यामध्ये शिरवली ग्रामपंचायतीच्या सरपंच तेजिता राजपकर तसेच उपसरपंच गोपीनाथ कुळये, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग सातोपे, रिया डिके, सानिका कुळये, दीपाली गोबरे, पांडुरंग राजापकर, ग्रामसेवक तसेच ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, कृषी सहाय्यक जाधव आदींसह ग्रामस्थ सहभागी झाले होते.
लांजात रोजगार व स्वयंरोजगार मेळावा
लांजा ः जागतिक अपंगदिनाचे औचित्य साधत जिल्हा परिषद व पंचायत समिती लांजा यांच्या विद्यमाने आमदार राजन साळवी यांच्या उपस्थितीत रोजगार व स्वयंरोजगार मेळावा लांजा पंचायत समितीत झाला. पंचायत समिती इमारतीमध्ये एक अपंग कक्ष देण्याचे कबूल करण्यात आले. त्या प्रसंगी तहसीलदार प्रमोद कदम, उज्ज्वला केळुस्कर, गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, बंडगर, संघटनेचे अध्यक्ष विलास गोरे, लाभार्थी अध्यक्ष गौतम कांबळे, मनोहर पावसकर, सुरेश दरडे, राजेंद्र निवळे यांच्यासह अपंग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळी
-rat३p२२.jpg ः
६६२७५
साखरपा ः नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करताना माजी सभापती जयसिंग माने.
साखरपा ग्रामपंचायत बिनविरोध, रूचिता जाधव सरपंच
साखरपा ः साखरपा ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. नऊ सदस्यांच्या या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच म्हणून रूचिता जाधव या कारभार सांभाळणार आहेत. साखरपा ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी नऊच ग्रामस्थांनी अर्ज भरला असल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार हे नक्की झाले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत पॅनलच्या उमेदवारांच्या विरोधात एकही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे मागील ३० वर्षांप्रमाणेच पुढील पाच वर्षे ही याच पक्षाची सत्ता ग्रामपंचायतीवर राहणार, हे निश्चित झाले आहे. थेट सरपंच पदासाठी रूचिता जाधव यांनी अर्ज भरला आहे. प्रभाग एकमधून सुमित वाघधरे, रश्मी साळसकर, गजानन पवार यांनी अर्ज भरला आहे. प्रभाग २ मधून अस्मी कुरूप, श्रद्धा सकपाळ, शशिकांत दुराव यांनी तर प्रभाग तीनमधून दीक्षा गोवरे, समृद्धी सुर्वे, ओंकार कोलते यांनी अर्ज भरला असून या सर्वांची निवड बिनविरोध झाली आहे. पंचायत समितीचे माजी सभापती जयसिंग माने यांनी नवनिर्वाचित सदस्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.