
राजापुरात जात प्रमाणपत्रांचे वाटप राजापुरात जात प्रमाणपत्रांचे वाटप संक्षिप्त
rat०३७.txt
(पान ५ साठी, संक्षिप्त)
फोटो ओळी
-rat३p१४.jpg ः
६६२४४
राजापूर ः राजापूर हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना जातप्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
राजापुरात जात प्रमाणपत्रांचे वाटप
रत्नागिरी ः सामाजिक न्याय विभागातर्फे संविधानदिन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन हा कालावधी समता पर्व म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने राजापूर हायस्कूल येथे जातवैधता प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. १२५ विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्राचे वाटप केले. कार्यक्रमाला जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षा डॉ. ज्योत्स्ना पडियार, प्रांताधिकारी वैशाली माने, तहसीलदार शीतल जाधव, प्राचार्य प्रकाश साळवी उपस्थित होते. या कार्यक्रमात राजापूर व लांजा तालुक्यातील सर्व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
फोटो ओळी
-rat३p१८.jpg-
६६२७१
जयगड ः एचआयव्ही प्रतिबंध दिनी जेएसडब्ल्यू फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना करुणाकांत दवे.
ट्रकचालक, क्लिन्नरांची आरोग्य तपासणी
रत्नागिरी ः एचआयव्ही प्रतिबंध दिवसानिमित्त जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या सहकार्याने तपासणी व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. जिल्हा शासकीय रुग्णालय जिल्हा एड्स आणि एचआयव्ही प्रतिबंध विभाग आणि बिनधास्त जनहित प्रतिष्ठान यांच्या सहयोगाने जयगड येथील ट्रक पार्किंगमध्ये हा कार्यक्रम झाला. या वेळी जेएसडब्ल्यू जयगड पोर्ट लिमिटेडचे युनिट हेड करूणाकांत दवे, लॉजिस्टिक विभाग हेड समीर गायकवाड, एचआर आणि अॅडमिन हेड वैभव राऊत, सिक्युरिटी हेड ग्यानेंदू आणि सीएसआर हेड अनिल दधिच उपस्थित होते. करूणाकांत दवे यांनी चालक आणि क्लिनरना सांगितले, प्रत्येकाने स्वतःचे आरोग्य चांगले राखले पाहिजे. त्यासाठी प्रतिबंध हाच उपाय आहे. समीर गायकवाड आणि अनिल दधिच यांनीही ट्रकचालकांसोबत संवाद साधला. सतीश कांबळे आणि राहुल खरात यांनी ट्रकचालकांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी ६६ ट्रकचालक उपस्थित होते. त्यातील ५० जणांची तपासणी केली. समुपदेशक रोहन सावंत आणि प्रकल्प व्यवस्थापक तनाश्री पांचाळ यांनी एचआयव्ही तपासणी केली. सीएसआर विभागाच्या योगिता महाकाळ, तेजस कवठेकर, तेजस महाकाळ, निकिता हांगे आणि श्रेष्ठा भट्टाचार्य यांनी केले.
फोटो ओळी
-rat३p१७.jpg ः
६६२७०
रत्नागिरी ः भाजपा कामगार आघाडीच्यावतीने अपेक्षा सुतार हिचा सत्कार करताना लिलाधर भडकमकर, संतोष बोरकर, प्राचीन नागवेकर आदी.
खो-खोपटू अपेक्षा सुतारचा सत्कार
रत्नागिरी ः खो-खोमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून राणी लक्ष्मीबाई पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू अपेक्षा सुतार हिचा सत्कार भाजपा कामगार आघाडीतर्फे करण्यात आला. अपेक्षाने धाराशिव येथे झालेल्या ५५व्या पुरुष व महिला (वरिष्ठ गट) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राकडून खेळताना सर्वोच्च व नेत्रदीपक कामगिरी केली. त्याबद्दल राणी लक्ष्मीबाई पुरस्कार प्राप्त झाला. या निमित्त भाजपा कामगार आघाडीच्या दक्षिण रत्नागिरीच्यावतीने अपेक्षाच्या घरी जाऊन आई-वडिलांसमवेत तिचा सत्कार करून तिचे कौतुक, अभिनंदन केले. या वेळी भाजपा कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भडकमकर, जिल्हा सरचिटणीस संतोष बोरकर, तालुकाध्यक्ष प्राचीन नागवेकर, कार्यकारिणी सदस्य संतोष बाष्टे आणि सतीश नलावडे उपस्थित होते.