Sun, March 26, 2023

मंडणगड ः निधन
मंडणगड ः निधन
Published on : 3 December 2022, 12:37 pm
rat०३२७.txt
(पान ४ साठी)
फोटो ओळी
-rat३p२३.jpg ः
६६२७६
रवींद्र पवार
पोलिस हवालदार रवींद्र पवार
मंडणगड ः बाणकोट सागरी पोलिस ठाण्यात पोलिस हवालदारपदी कार्यरत असलेले रवींद्र लक्ष्मण पवार (वय ४५) यांचे ३ डिसेंबरला हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. छातीत दुखू लागल्याने त्यांना भिंगळोली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्यांना प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बाहेर नेत असताना गाडीमध्येच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुली असा परिवार आहे. ते मुळचे नंदुरबार येथील रहिवासी असून, त्यांचा मृतदेह त्यांच्या गावी नंदुरबार येथे नेण्यात आला. मागील पाच वर्षे ते मंडणगड पोलिस ठाण्यात कार्यरत होते. वर्षभरापूर्वीच त्यांची बाणकोट सागरी पोलिस ठाण्यात बदली झाली होती.