जानवली आदर्शनगरातील तरूणावर तिघांचा हल्‍ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जानवली आदर्शनगरातील 
तरूणावर तिघांचा हल्‍ला
जानवली आदर्शनगरातील तरूणावर तिघांचा हल्‍ला

जानवली आदर्शनगरातील तरूणावर तिघांचा हल्‍ला

sakal_logo
By

जानवली आदर्शनगरातील
तरूणावर तिघांचा हल्‍ला

गुन्हा दाखल; जीवे मारण्याचा प्रयत्न

कणकवली, ता.३ : आपला पुतण्या शिवानंद दत्तात्रय जंगम याच्या डोक्यावर लाकडी काठीने प्रहार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न तिघा युवकांनी केल्याची फिर्याद जानवली आदर्शनगर येथील सुनील रामचंद्र जंगम (वय ५९) यांनी आज कणकवली पोलिस ठाण्यात दिली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला.
सुनील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा पुतण्या शिवानंद याच्या मैत्रिणीचा मित्र संशयित प्रेमकुमार नलावडे आणि त्याच्या दोन साथीदारांनी आदर्शनगर जानवली येथे राहत्या घराजवळ लाकडी काठीने शिवानंदच्या डोक्यात लाकडी काठीने प्रहार केला. या जीवघेण्या हल्ल्यात शिवानंदचे डोके फुटून तो रक्तबंबाळ झाला. ही घटना २ डिसेंबरच्या रात्री नऊला घडली. हल्ल्यानंतर प्रेमकुमार व त्याचे साथीदार घटनास्थळावरून पसार झाले. जखमी शिवानंदवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संशयित प्रेमकुमार नलावडे व त्याच्या साथीदारांवर आयपीसी ३०७, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. महिला पोलिस उपनिरीक्षक वृषाली बर्गे अधिक तपास करत आहेत.