
राजापुरात सदस्यपदासाठी दुप्पट उमेदवारी अर्ज दाखल
rat०३३१.txt
(पान २ साठी)
राजापुरात सदस्यपदासाठी दुप्पट उमेदवारी अर्ज दाखल
ग्रामपंचायत निवडणूक ; उद्या छाननी, बुधवारी माघार
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३ ः तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरामध्ये सुरू असून, निर्धारित कालावधीमध्ये सदस्यांच्या २४९ जागांसाठी तब्बल ३९३ अर्ज दाखल झाले आहेत, तर थेट सरपंचांसाठीच्या ३१ जागांसाठी तब्बल १०३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. एकंदरित, थेट सरपंचांच्या निवडीसह सदस्यपदासाठी तब्बल दुप्पट उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
सरपंच आणि सदस्यपदासाठी दाखल झालेल्या अर्जांची सोमवारी (ता. ५) छाननी होणार आहे, तर बुधवारी (ता.७) अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निर्धारित कालावधीमध्ये ग्रामपंचायत सदस्यपदासाठी मिठगवाणे येथे १४, नाणार- ८, परूळे- १०, शिवणेबुद्रुक- ७, तळवडे- ९, नाटे- २५, साखर- ९, वडवली- ९, वाटूळ- १८, डोंगर- १०, कळसवली- २०, साखरीनाटे- १९, झर्ये- २, उपळे- ७, शेजवली- ४, प्रिंदावण- ११, कोतापूर- २२, देवीहसोळ- १०, जैतापूर- २१, हातिवले- १०, आजिवली- १७, ओझर- ९, कोळवणखडी- ५, जुवाठी- १६, येळवण- ६, पाचल- ३०, खरवते- १३, माडबन- १४, विल्ये- १३, हसोळतर्फे सौंदळ- ९, धाऊलवल्ली येथे १६ अर्ज दाखल झाले आहेत.
सरपंचपदासाठी मिठगवाणे- ३, नाणार- १, परूळे- २, शिवणेबुद्रुक-१, तळवडे- १, नाटे-७, साखर-३, वडवली- १, वाटुळ- ३, डोंगर-४, कळसवली- ४, साखरीनाटे- ३, झर्ये- १, उपळे- ३, शेजवली- १, प्रिंदावण- ४, कोतापूर-५, देवीहसोळ- २, जैतापूर- ८, हातिवले- ३, आजिवली-४, ओझर-५, कोळवणखडी- १, जुवाठी- ५, येळवण- ३, पाचल- ४, खरवते- ५, माडबन- ४, विल्ये- ४, हसोळतर्फ सौंदळ- ६, धाऊलवल्ली- २ अर्ज दाखल झाल्याची माहिती महसूल प्रशासनाकडून देण्यात आली.