टंचाई आराखड्याचे प्रस्ताव 15 जानेवारीपूर्वी द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टंचाई आराखड्याचे प्रस्ताव 15 जानेवारीपूर्वी द्या
टंचाई आराखड्याचे प्रस्ताव 15 जानेवारीपूर्वी द्या

टंचाई आराखड्याचे प्रस्ताव 15 जानेवारीपूर्वी द्या

sakal_logo
By

rat०३२२.txt

(पान ३ साठी)

फोटो ओळी
-rat३p१९.jpg ः
६६२७२
रत्नागिरी ः टंचाई आराखड्यासंदर्भात आयोजित कार्यशाळेत बोलताना पालकमंत्री उदय सामंत. शेजारी कीर्तीकिरण पुजार, परिक्षित यादव, शुभांगी साठे, नंदिनी घाणेकर आदी.


टंचाई आराखड्याचे प्रस्ताव १५ जानेवारीपूर्वी द्या

उदय सामंतांचे आदेश ; जलजीवनमधून जिल्ह्याला ८६० कोटी
सकाळ वृत्तसेवा ः
रत्नागिरी, ता. ३ ः टंचाईसंदर्भात पूर्वनियोजन उत्तमरित्या व्हावे यासाठी १५ जानेवारीपूर्वी सर्व ग्रामपंचायतींनी प्रस्ताव सरपंच, ग्रामसेवकांना सादर होतील असे काम करा तरच हे प्रस्ताव वेळेत जिल्हाधिकाऱ्यांना सादर होऊन ते मंजूर होतील; मात्र हात राखून आराखडा तयार करू नका, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. जलजीव मिशनमधून कोकणात सर्वांत जास्त ८६० कोटीची कामे जिल्ह्यात मंजूर झाली आहेत. येत्या महिनाभरात ही कामे सुरू होतील, असेही त्यांनी सांगितले.
पाणीटंचाई आराखड्यासंदर्भात आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, प्रभारी जिल्हाधिकारी शुभांगी साठे, प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर आदी उपस्थित होते.
उदय सामंत म्हणाले, जिल्ह्यासाठी ८६० कोटी रुपये जलजीवन मिशनअंतर्गत देण्यात आले असून त्या कामांना गती द्यावी तर टंचाई आराखडे वेळेत दिल्यास जिल्हा प्रशासनाकडून त्याला मंजुरी मिळेल. अन्यथा पाऊस पाडायला सुरवात झाल्यानंतर प्रस्ताव जातात आणि मग टंचाईचे प्रस्ताव मागे पडतात. त्यामुळे पुन्हा त्या गावाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. रत्नागिरी तालुक्यात प्रादेशिक नळपाणी योजनेसाठी १५० कोटींची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. यामुळे आता या योजना पूर्ण करून घेण्यासाठी सरपंचांचीही जबाबदारी वाढली आहे. जिल्ह्यात १ हजार ३६३ नळपाणी योजनांची कामे पूर्ण करायची आहेत. या कामांना गती दिल्यास ३ वर्षात संपूर्ण जिल्हा टंचाईमुक्त होईल, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.