पत्रकार भवनाचे जानेवारीत उद्‍घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्रकार भवनाचे जानेवारीत उद्‍घाटन
पत्रकार भवनाचे जानेवारीत उद्‍घाटन

पत्रकार भवनाचे जानेवारीत उद्‍घाटन

sakal_logo
By

66301
कुडाळ ः सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची विशेष सभा येथील विश्रामगृहावर जिल्हाअध्यक्ष उमेश तोरसकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

पत्रकार भवनाचे जानेवारीत उद्‍घाटन

कुडाळातील बैठकीत निर्णय; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह दिग्गजांची उपस्थिती शक्य

कुडाळ, ता. ३ ः सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची विशेष सभा येथील विश्रामगृहावर नुकतीच झाली. पत्रकार दिनाच्या निमित्ताने ६ जानेवारीला सिंधुदुर्ग मुख्यालय येथे सिंधुदुर्ग सुपुत्र दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक इमारतीचा उद्‍घाटन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या विशेष बैठकीत घेण्यात आला.
अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर, मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष गजानन नाईक, विभागीय सचिव नंदकिशोर महाजन, सचिव देवयानी वरसकर, खजिनदार संतोष सावंत, उपाध्यक्ष महेश सरनाईक, बंटी केनवडेकर, बाळ खडपकर कार्यकारिणी सदस्य दीपेश परब, राजन नाईक, हरिश्चंद्र पवार, संतोष राऊळ यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी जिल्हा पत्रकार संघाची एक समिती जिल्हाध्यक्ष तोरस्कर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे जाऊन मान्यवरांना निमंत्रित करणार आहे.
जिल्ह्यातील पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांना ओळखपत्रे मिळण्यासाठी संघाचे कार्यकारी सदस्य राजन नाईक यांच्या हॉटेल आरएसएन कुडाळ येथे आधार कार्ड झेरॉक्स व फोटो यांच्यासह १० पर्यंत द्यायचे आहेत, असा ठराव या बैठकीत आयत्या विषयामध्ये घेण्यात आला. तसेच सभासद फी ३० पर्यंत खजिनदार सावंत यांच्याकडे जमा करायची आहे.
--
अभिनंदनाचे घेतले ठराव
पत्रकार संघाच्या या भवनासाठी लागणारी मदत केल्याबद्दल आमदार नीतेश राणे यांच्या अभिनंदनाचा ठराव बैठकीत घेण्यात आला. संघाचे कार्यकारी सदस्य राजन नाईक यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स राज्य पर्यटन समितीवर सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर झाला. तसेच पत्रकार भवनाच्या स्वप्नपूर्तीचे पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल परिषदेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष गजानन नाईक यांच्याही अभिनंदनाचा ठराव घेतला. संतोष राऊळ, राजन नाईक, बंटी केनवडेकर, नंदकिशोर महाजन हे चर्चेत सहभागी झाले.