Mon, March 27, 2023

अल्पवयीन मुलीवर अत्याचार
प्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा
अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा
Published on : 3 December 2022, 2:56 am
अल्पवयीन मुलीवर अत्याचार
प्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा
सावंतवाडी, ता. ३ ः एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून मातृत्व लादल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार प्रेमसंबंधातून घडला आहे. संबंधित मुलगी तीन महिन्यांची गर्भवती आहे. सावंतवाडीचे पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी ही माहिती दिली.
अधिक माहिती अशी की, संबंधित युवतीसोबत संशयिताचे प्रेमसंबंध होते. संबंधित मुलीला आज अत्यवस्थ वाटू लागल्याने तिच्या नातेवाईकांनी तिला एका रुग्णालयात दाखल केले. या वेळी तिची वैद्यकीय तपासणी केली असता ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार नातेवाईकांनी येथील पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संबंधित युवकाविरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली.