
अत्याचार प्रकरणी जामीन फेटाळला
अत्याचार प्रकरणी
जामीन फेटाळला
ओरोस, ता. ३ ः अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेला संशयित ऑल्विन रुजाय पिंटो (रा. माजगाव गरड, पाटणकरवाडा, ता. सावंतवाडी) याचा जामीन अर्ज विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला. या कामी सरकारी वकील रुपेश देसाई यांनी युक्तिवाद केला.
याबाबत पीडित मुलीच्या फिर्यादीनुसार, संशयित ऑल्विनच्या विरोधात पोक्सोसह विविध कलमांनुसार १६ सप्टेंबरला गुन्हा दाखल करून त्याच दिवशी त्याला अटक केली होती. संशयिताचा जामीन अर्ज नामंजूर होण्यासाठी सरकारी देसाई यांनी पीडित युवती ही अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही संशयिताने तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेत लैंगिक अत्याचार केला. पीडिता घाबरलेल्या अवस्थेत असून तिची मनस्थिती ठीक नाही. या गुन्ह्यात संशयिताचा सक्रिय सहभाग असल्याचे पुरावे आहेत, या बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यांचा युक्तवाद ग्राह्य मानून संशयिताचा जामीन अर्ज विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने नामंजूर केला.