माथाडी कामगार संघटना उपाध्यक्षपदी अॅड. पार्सेकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माथाडी कामगार संघटना
उपाध्यक्षपदी अॅड. पार्सेकर
माथाडी कामगार संघटना उपाध्यक्षपदी अॅड. पार्सेकर

माथाडी कामगार संघटना उपाध्यक्षपदी अॅड. पार्सेकर

sakal_logo
By

माथाडी कामगार संघटना
उपाध्यक्षपदी अॅड. पार्सेकर
सावंतवाडी, ता. ३ ः नवीन अखिल महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनेची मुंबईत स्थापना करण्यात आली असून येथील सामाजिक कार्यकर्ते अॅड. नकुल पार्सेकर यांची संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली.
कामगार क्षेत्रातील नवीन आव्हाने, बदलते कामगार कायदे, उदार आर्थिक धोरण व झपाट्याने होणारे जागतिकीकरण व यांत्रिकीकरण यामुळे कामगारांच्या रोजीरोटीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः असंघटित क्षेत्रातील कामगारांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. या सर्वाचा विचार करून या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. मुंबईच्या आर्थिक व सामाजिक जडणघडणीत माथाडी व वाहतूक कामगारांचा फार मोठा वाटा आहे. आतापर्यंत या घटकांचा फक्त राजकीय वापर केला. या शोषित कामगारांचे मूलभूत प्रश्न व त्यांना त्यांचे कायदेशीर हक्क मिळवून देण्यासाठी यापूर्वी कामगार क्षेत्रात काम केलेल्या समविचारी व अनुभवी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन मुंबईत नवीन अखिल महाराष्ट्र माथाडी, वाहतूक आणि जनरल कामगार संघटनेची स्थापना केली आहे. या संघटनेच्या उपाध्यक्षपदी सिंधुदुर्गचे सुपुत्र व सामाजिक कार्यकर्ते अॅड. पार्सेकर यांची निवड करण्यात आली. पार्सेकर यांनी टपाल खात्यात नोकरीला असताना सलग वीस वर्षे कामगार क्षेत्रात काम केले होते. भारतीय मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी रस्ते कामगार, उषा इस्पात, खाते बाह्य डाक कर्मचारी अशा आस्थापनेत काम करणाऱ्या शेकडो कामगारांच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला होता. मुंबई, भायखळा येथील हॉटेल हेरिटेज येथे संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. कार्याध्यक्षपदी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, तर अध्यक्ष म्हणून एस. आर. हळदणकर, ज्येष्ठ विधीज्ञ राकेश भाटकर यांची कायदेशीर सल्लागार म्हणून निवड झाली.