देवगडमध्ये ३८ गावांच्या सरपंचपदासाठी ११० अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगडमध्ये ३८ गावांच्या सरपंचपदासाठी ११० अर्ज
देवगडमध्ये ३८ गावांच्या सरपंचपदासाठी ११० अर्ज

देवगडमध्ये ३८ गावांच्या सरपंचपदासाठी ११० अर्ज

sakal_logo
By

देवगडमध्ये ३८ गावांच्या सरपंचपदासाठी ११० अर्ज

सदस्यपदासाठी ५०० अर्ज, माघारासाठी बुधवारची अंतिम मुदत

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ३ : तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी सरपंच पदाच्या ३८ जागांसाठी एकूण ११० तर सदस्यपदाच्या ३०२ जागांसाठी एकूण ५०० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. प्रथमदर्शनी आरे, कट्टा, कुणकवण, गवाणे, गोवळ, चाफेड, पाटगांव, पोंभुर्ले अशा एकूण आठ ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने आठ ठिकाणच्या सरपंच जागा बिनविरोध ठरण्याची शक्यता आहे. काही ग्रामपंचायती पूर्णतः बिनविरोध ठरणार आहेत. दरम्यान, बुधवारी (ता.७) दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.
तालुक्यातील एकूण ३८ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. ३८ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदाच्या ३८ आणि सदस्यपदाच्या ३०२ अशा एकूण ३४० जागांसाठी निवडणूक होणार आहे. उमेदवारी दाखल करण्याच्या अंतिम दिवसापर्यंत सरपंचपदासाठी ११० तर सदस्यपदासाठी ५०० अर्ज दाखल झाले आहेत. अंतिम दिवसापर्यंत सरपंचपदासाठी आरे (१ अर्ज), ओंबळ (४), उंडील (४), कट्टा (१), किंजवडे (३), कुवळे (२), कुणकवण (१), कोटकामते (३), खुडी (३), गवाणे (१), गिर्ये (२), गोवळ (१), चांदोशी (२), चाफेड (१), तोरसोळे (४), दहिबांव (२), दाभोळे (४), नाद (५), नारिंग्रे (४), पडेल (५), पेंढरी (२), पाटगाव (१), पोंभुर्ले (१), पोयरे (२), फणसे (२), बापर्डे (४), बुरंबावडे (२), मणचे (३), महाळुंगे (२), मिठमुंबरी (९), वाघिवरे-वेळगिवे (८), वाघोटण (२), विजयदुर्ग (०), सांडवे (५), साळशी (२), सौंदाळे (४), हडपीड (३), हिंदळे (५) असे अर्ज आले आहेत. यामध्ये प्रथमदर्शनी आरे, कट्टा, कुणकवण, गवाणे, गोवळ, चाफेड, पाटगांव, पोंभुर्ले अशा एकूण आठ ग्रामपंचायतींमधील सरपंचपदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने सरपंच बिनविरोध होण्याची शक्यता आहे. तर सदस्यपदासाठी आरे (६ अर्ज), ओंबळ (६), उंडील (७), कट्टा (८), किंजवडे (२७), कुवळे (१५), कुणकवण (८), कोटकामते (२३), खुडी (१८), गवाणे (७), गिर्ये (१८), गोवळ (८), चांदोशी (१४), चाफेड (७), तोरसोळे (२२), दहिबांव (९), दाभोळे (१०), नाद (८), नारिंग्रे (१७), पडेल (१७), पेंढरी (६), पाटगाव (७), पोंभुर्ले (१२), पोयरे (१९), फणसे (१८), बापर्डे (१२), बुरंबावडे (१०), मणचे (१३), महाळुंगे (१०), मिठमुंबरी (१४), वाघिवरे -वेळगिवे (९), वाघोटण (१८), विजयदुर्ग (२५), सांडवे (१०), साळशी (१४), सौंदाळे (२१), हडपीड (१०), हिंदळे (१७) असे एकूण ५०० अर्ज आले आहेत. यातील काही ग्रामपंचायतींमध्ये मोजकेच अर्ज आल्याने अशा ग्रामपंचायतींमधील सदस्य बिनविरोध ठरण्याची शक्यता आहे.
....................
चौकट
सर्वाधिक चुरस मिठमुंबरीतच
सरपंचपदासाठी सर्वाधिक मिठमुंबरी ग्रामपंचायतीमध्ये ९ अर्ज, त्यानंतर वाघिवरे-वेळगिवे ग्रामपंचायतीसाठी ८ अर्ज आले आहेत. विजयदुर्ग ग्रामपंचायतीमधून सरपंचपदासाठी एकही अर्ज आलेला नाही. तर सदस्यपदासाठी किंजवडे ग्रामपंचायतीमधून २७ अर्ज आले आहेत.