‘हापूस’ची गुणवत्ता अबाधित ठेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘हापूस’ची गुणवत्ता अबाधित ठेवा
‘हापूस’ची गुणवत्ता अबाधित ठेवा

‘हापूस’ची गुणवत्ता अबाधित ठेवा

sakal_logo
By

66339
देवगड ः येथे सुधीर सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. बाजूला तुषार पेडणेकर, अमोल लोके. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)

‘हापूस’ची गुणवत्ता अबाधित ठेवा

बिग्रेडीयर सावंत ः देवगडात ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्ष कार्यालयात संवाद

देवगड, ता. ३ ः रासायनिक खतांचा भडीमार, ‘कल्टार’चा बेसुमार वापर यामुळे ‘देवगड हापूस’ची ढासळत जाणारी गुणवत्ता अबाधित राखण्यासाठी शेतकऱ्यांनी मशागतीमध्ये बदल केला पाहिजे. गुणवत्तापूर्वक फळे मिळण्यासाठी आंबा कलमांचे आरोग्य सुधारण्याबाबत प्रयत्न झाले पाहिजेत, असे मत बिग्रेडीयर सुधीर सावंत यांनी येथे व्यक्त केले. आंबा बागांमध्ये आंतरपीक घेण्यासाठी बागायतदारांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सूचित केले.
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या येथील संपर्क कार्यालयात सावंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विलास सावंत, कणकवली तालुका समन्वयक सुनील पारकर, तुषार पेडणेकर, अमोल लोके आदी उपस्थित होते. बिग्रेडीयर सावंत म्हणाले, ‘‘हापूस आंबा कोकणच्या संस्कृतीचा भाग आहे; मात्र रासायनिक खतामुळे हापूस अडचणीत सापडेल. आंबा बागायतदारांना फळबाजारात आंबा विक्रीसाठी मी प्रयत्न केले होते. सुरुवातीला यामध्ये मी काम केले होते. आंबा कलमांची गुणवत्ता जोपासली पाहिजे. रासायनिक खतांचा भडीमार, कल्टारचा बेसुमार वापर यामुळे कालांतराने देवगड हापूसची गुणवत्ता बदलते याची चिंता आहे. हापूसची गुणवत्ता टिकवण्यासाठी मशागतीमध्ये बदल केला पाहिजे. आपल्या शरीराप्रमाणेच झाडांची प्रतिकारशक्ती वाढवणे आवश्यक आहे. पर्यटन वाढीसाठी बंदरांचा विकास झाला पाहिजे. विजयदुर्ग बंदर विकास झाल्यास सोयीचे होईल. प्रवाशांसाठी सुविधा निर्माण झाल्यास सागरी मार्गाने कोकण भ्रंमती करणे शक्य असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
..................
काँग्रेस उभारी घेणे कठीण
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेबाबत बोलताना सुधीर सावंत यांनी, ‘‘आता याला उशीर झाला आहे. यापुढे काँग्रेस उभारी घेणे अवघड आहे,’’ असे मत व्यक्त केले. काँग्रेसमधील खालच्या फळीतील कार्यकर्त्यांचा विकास झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. राज्याला तळागाळातील कार्यकर्त्यांची जाण असलेला मुख्यमंत्री लाभल्याचेही ते म्हणाले.
--
चौकट
स्टार मानांकन गरजेचे
पर्यटकांच्या सेवेसाठी चांगली निवास न्याहारी केंद्रे, उत्तम हॉटेल झाली पाहिजेत. हॉटेलप्रमाणेच निवास न्याहारी यांनाही ''स्टार मानांकन'' दिल्यास पर्यटन विस्तारण्याच्या दृष्टीने सोयीचे होईल, असे सावंत म्हणाले.