पर्यटनाच्या नवसंकल्पना आत्मसात करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यटनाच्या नवसंकल्पना आत्मसात करा
पर्यटनाच्या नवसंकल्पना आत्मसात करा

पर्यटनाच्या नवसंकल्पना आत्मसात करा

sakal_logo
By

66338
देवगड ः तारामुंबरीमध्ये आयोजित बांगडा महोत्सवाचे उद्‌घाटन झाल्यानंतर स्टॉलची पाहणी करताना आमदार नीतेश राणे. (छायाचित्र ः वैभव केळकर)

पर्यटनाच्या नवसंकल्पना आत्मसात करा

आमदार नीतेश राणे ः तारामुंबरी येथे बांगडा महोत्सवाचे उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ३ ः पर्यटनामध्ये नवीन संकल्पना आत्मसात केल्यास यश निश्‍चित आहे. परराज्यातील पर्यटक कोकणातील संस्कृती आणि येथील खाद्यपदार्थांसह कोकणचे राहणीमान अनुभवण्यासाठी येत असतात. येथील खाद्य संस्कृतीची त्यांना जवळून ओळख होण्यासाठी त्यांच्या आवडी-निवडीचा अभ्यास करणे गरजेचे आहे, असे मत आमदार नीतेश राणे यांनी येथील तारामुंबरीमध्ये व्यक्त केले. पर्यटक जादा पैसे मोजायला तयार असतात; मात्र त्यांच्यासाठी चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
येथील देवगड तालुका व्यापारी पर्यटन विकास समितीतर्फे आयोजित तारामुंबरी येथील बांगडा महोत्सवाचे उद्‌घाटन आमदार आमदार राणे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कोकणात येणारे पर्यटक, त्यांच्या आवडीनिवडी आणि पसंती तसेच त्यांच्यासाठी स्थानिकांनी कोणती सेवा देण्याची आवश्यकता आहे, यातील अर्थकारण आणि उलाढाल या अनुषंगाने त्यांनी आपले विचार व्यक्त केले. पर्यटकांची पसंती कशामध्ये आहे हे ओळखून त्यांना सेवा देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. मंचावर समितीचे अध्यक्ष प्रमोद नलावडे, व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर, तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष शैलेश कदम, बाळ खडपे, प्रणाली माने, योगेश चांदोस्कर यांच्यासह अन्य उपस्थित होते. यावेळी आमदार राणे यांनी खाद्यपदार्थ स्टॉलला भेट देऊन माहिती जाणून घेतली. यावेळी लक्ष्मण तारी, प्रियांका तारी, संजय तारकर, मिलिंद माने यांच्यासह अन्य उपस्थित होते. मिलिंद कुबल यांनी आभार मानले. दरम्यान, बांगडा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी गाणी गाऊन अनेकांनी मजा घेतली.
.....................
चौकट
खवय्यांची पसंती
या महोत्सवात निखाऱ्यावर भाजलेला ताजा बांगडा, कुळीथ पिठलं, तांदुळाची भाकरी, भात, सोलकडी, नारळाची चटणी असा मेनू होता. या पदार्थांना खवय्यांकडून चांगली पसंती लाभली.