गद्दारांना मतदारच जागा दाखवतील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गद्दारांना मतदारच जागा दाखवतील
गद्दारांना मतदारच जागा दाखवतील

गद्दारांना मतदारच जागा दाखवतील

sakal_logo
By

फोटो ओव्हरसेट

66347
दोडामार्ग ः आढावा बैठकीत बोलताना तालुकाप्रमुख संजय गवस. व्यासपीठावर खासदार राऊत, संजय पडते, बाळा गावडे आदी.

गद्दारांना मतदारच जागा दाखवतील

विनायक राऊत ः दोडामार्गमध्ये निवडणुकीसंदर्भात आढावा

दोडामार्ग, ता. ४ : येत्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेतून फुटून गेलेल्या गद्दारांच्या गटाला तालुक्यातील मतदारच जमीन दाखवतील, असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी आज येथे व्यक्त केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जनतेचा विश्वास आहे. तर दोडामार्ग तालुक्यावर उद्धव ठाकरे यांचे विशेष प्रेम आहे. त्यामुळे जनता आमच्या पाठीशीच असणार आहे. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुरस्कृत उमेदवार विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ते येथील आढावा बैठकीत बोलत होते.
ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार राऊत यांनी दोडामार्गमधील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधत निवडणुकीसंदर्भात आढावा घेतला. यावेळी काही दुरावलेले कार्यकर्ते पुन्हा स्वगृही परतले. त्यांचेही स्वागत खासदार राऊत यांनी केले. यावेळी तालुकाप्रमुख संजय गवस, जिल्हाध्यक्ष संजय पडते, उपजिल्हा प्रमुख बाबूराव धुरी, सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे प्रमुख विक्रांत सावंत, अतुल रावराणे, महिला जिल्हाध्यक्ष नीता सावंत, बाळा गावडे, महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख विनिता घाडी, महिला तालुका प्रमुख श्रेयाली गवस, युवासेना तालुकाप्रमुख मदन राणे, उपतालुकाप्रमुख मिलिंद नाईक, युवासेना शहरप्रमुख ओंकार कुलकर्णी, विजय जाधव, माजी नगराध्यक्षा लीना कुबल, आनंद रेडकर आदी उपस्थित होते.