
मर्चंट नेव्ही करिअर मार्गदर्शन
rat०४११.txt
(टुडे पान २ साठी)
फोटो ओळी
-rat४p३.jpg ः
६६३९३
गुहागर ः मर्चंट नेव्हीमधील संधींबद्दल बोलताना इम्रान कोंडकरी.
आव्हानात्मक करिअरसाठी नेव्हीचा पर्याय
इम्रान कोंडकरी ; गुहागरला मर्चंट नेव्ही करिअर मार्गदर्शन
गुहागर, ता. ५ ः विद्यार्थ्यांना करिअर नेमकं कोणत्या क्षेत्रात करता आले पाहिजे त्या क्षेत्राची माहिती असणे गरजेचे आहे. यापैकी मर्चंट नेव्ही हे एक अत्यंत महत्वाचं क्षेत्र आहे. इथे रोज आव्हानांचा सामना करावा लागतो. अनेक दिवस चहुबाजूने फक्त समुद्राचे पाणीच दिसते. त्यामुळे लढाऊ वृत्तीसह सहनशीलता, संयम असावा लागतो. संघर्षमय नोकरी असल्याने कमी कालावधीत अन्य पगारांच्या तुलनेत अधिक पैसे मिळतात. तंत्रकुशल तरुणांना रोजगाराच्या अनेक संधी मर्चंट नेव्हीमध्ये आहेत, असे मर्चंट नेव्ही इंजिनिअर इम्रान कोंडकरी यांनी सांगितले.
गुहागर एज्युकेशन सोसायटी आणि लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठानतर्फे मर्चंट नेव्ही करिअर मार्गदर्शन शिबिर गुहागर रंगमंदिर येथे झाले. त्यावेळी ते बोलत बोलत होते. विद्यार्थ्यांना करिअर करण्याचे एक महत्वाचे क्षेत्र म्हणजे मर्चंट नेव्ही. या क्षेत्रात करिअरची उत्तम संधी आहे. मर्चंट नेव्ही या क्षेत्राविषयी जागरूकता निर्माण व्हावी म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी गुहागर एज्युकेशन सोसायटीचे संचालक दीपक कनगुटकर, लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष साहिल आरेकर, गुहागर एज्युकेशन सोसायटी संचालिका स्वाती कचरेकर, मुख्याध्यापक शिवाजी आडेकर, उपमुख्याध्यापक सुधाकर कांबळे शिक्षक, पालक आदीसह विद्यार्थी उपस्थित होते.