सदर ः लोकल टू ग्लोबल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सदर ः लोकल टू ग्लोबल
सदर ः लोकल टू ग्लोबल

सदर ः लोकल टू ग्लोबल

sakal_logo
By

२८ नोव्हेबर टुडे पान ३ वरून लोगो व लेखकाचा फोटो घेणे...

फोटो ओळी
-rat४p७.jpg ः डॉ. गजानन पाटील
-----------
शिक्षण ः लोकल टू ग्लोबल..............लोगो

कमी पटसंख्याच्या शाळाही गुणवत्तेत अग्रेसर

शाळेची विद्यार्थीसंख्या किती आहे यावर त्या शाळेची गुणवत्ता अवलंबून असते, असा एक गैरसमज सर्वत्र पाहायला मिळतो. जर विद्यार्थीसंख्या जास्त असेल तर गुणवत्ता चांगली असते आणि विद्यार्थीसंख्या कमी असेल तर गुणवत्ता कमी असते. अशा प्रकारचं काहीतरी गुणोत्तर मानलं गेलं होतं. त्यामुळेच कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्यासंदर्भात अनेकवेळा सूचित करण्यात आले होते. जपानसारख्या छोट्याशा देशात एका मुलासाठी ५० किलोमीटरची रेल्वे धावते आणि शाळा भरवली जाते तर आपल्या देशात कमी पटसंख्यांच्या शाळा का सुरू ठेवण्यात येऊ नयेत? असाही प्रक प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. यावर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या सूचनेनुसार डाएट रत्नागिरीने एक संशोधन केले. या संशोधनात असं सिद्ध झालं की, कमी पटसंख्यांच्या शाळेतील गुणवत्ता आणि जास्त पटसंख्या असलेल्या शाळेतली गुणवत्ता ही समान आहे. यामध्ये मराठी शाळेबरोबरच उर्दू शाळांचाही समावेश करण्यात आला होता.
- डॉ. गजानन पाटील
------------

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यामधील डीएड् कॉलेजचे प्रा. रणजीत देसाई यांनी डाएट रत्नागिरीच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच एक लघु संशोधन केले. या संशोधनाचा विषय होता, रत्नागिरी जिल्ह्यातील जास्त पटसंख्या असलेल्या व कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शैक्षणिक गुणवत्तेचा तुलनात्मक अभ्यास. या प्रायोगिक लघु संशोधनामध्ये राजापूर तालुक्यातील कमी पटसंख्या असलेल्या व जास्त पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा तसेच जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा यांचा तुलनात्मक अभ्यास केला गेला. तेव्हा असे दिसून आले की, विद्यार्थीसंख्या जरी कमी असली तरी शिक्षक खूप चांगल्या प्रकाराचे प्रत्येक मुलाकडे लक्ष देऊन त्याला शिकवण्याचा प्रयत्न करतात. जास्त पटसंख्या असलेल्या शाळेतील शिक्षकसुद्धा प्रत्येक मुलाकडे जातीने लक्ष देऊन शिकवण्याचा प्रयत्न करतात. खरंतर, सिंधुदुर्ग-रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये प्राथमिक शाळांमध्ये काम करणारे शिक्षक मनापासून काम करताना दिसून येतात. त्यामुळेच प्राथमिक शिक्षणाचा पाया नीट झाल्याकारणाने त्याची फलनिष्पत्ती ही माध्यमिक आणि उच्च माध्यमिक निकालावर दिसून येते. उर्दू शाळेमध्येसुद्धा मुलांना शिकवण्यामध्ये शिक्षक आपापल्यापरीने प्रयत्न करतात; पण कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद पडतील की काय, या भीतीने शिक्षक मात्र खूप अस्वस्थ झालेले दिसले. तसंच दोन वर्ष कोरोनाच्या कालखंडामध्ये शाळा बंद पडल्याने मुलांना अभिव्यक्तीमध्ये समस्या दिसून आल्या. गणित आणि इंग्रजी विषयांमध्ये प्रगती करण्यासाठी डाएटमार्फत दिलेल्या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षक मुलांना घडवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे दिसून आले.
ज्या ग्रामीण भागामध्ये मुलांचे पालक अशिक्षित आहेत त्या मुलांच्या अभ्यासाकडे वैयक्तिकरित्या शिक्षक लक्ष ठेवून असतात, असे दिसून आले. कोरोनाच्या कालखंडात ऑनलाइन नसेना पण ऑफलाइन पद्धतीने शिक्षक मुलांना शिकवण्यासाठी प्रयत्न करत होते. हेही या लघु संशोधनात दिसून आले. हे लघु संशोधन या निष्कर्षाप्रत आले की, कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करून चालणार नाहीत. कारण, त्या जर बंद केल्या तर त्या वाडीवस्तीतील मुलांनी शाळेसाठी जायचं कुठे? मग कदाचित ते शाळाही सोडतील आणि आपापल्या वडिलोपार्जित पारंपरिक व्यवसायात काम करतील. ही भविष्यातील शक्यता मात्र नाकारता येत नाही. म्हणून एक मुलासाठी का असेना, शाळा आहे. ती शाळा अधिक विकसित करून त्या मुलाला शिकवण्यासाठी शिक्षकांना प्रेरित करायला हवं. एकूणच या तुलनात्मक लघु संशोधनांमध्ये पटसंख्येचा प्रश्न नाही तर आपल्या सर्वांच्या मानसिकतेचा हा प्रश्न आहे. त्यामुळे आपण सर्वांनी यामध्ये प्रयत्न केले तर आपलं प्राथमिक शिक्षण अधिक गतिमान निश्चित होईल.

(लेखक प्रयोगशिल शिक्षणतज्ज्ञ, मानसतज्ज्ञ व समुपदेशक असून स्तंभलेखक आहेत.)