मडुऱ्यात क्रीडा महोत्सव उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मडुऱ्यात क्रीडा महोत्सव उत्साहात
मडुऱ्यात क्रीडा महोत्सव उत्साहात

मडुऱ्यात क्रीडा महोत्सव उत्साहात

sakal_logo
By

66435
मडुरा ः क्रीडा महोत्सवाचे उदघाट्न करताना शैलेंद्र आरणीकर. शेजारी भिकाजी धुरी, सुभाष मोर्ये आदी.

मडुऱ्यात क्रीडा महोत्सव उत्साहात

नाबर प्रशालेचा उपक्रम; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ४ ः श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट संचलित मडुरा येथील व्ही. एन. नाबर इंग्लिश मीडियम प्रशालेत वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात झाला. या कार्यक्रमासाठी शारदा शिक्षण सोसायटी म्हापसा-गोवाचे शैलेंद्र आरणीकर, लोकल कमिटी चेअरमन भिकाजी धुरी, शिक्षण प्रसारक मंडळ बांदाचे सुभाष मोर्ये, पालक सदस्य अदिती वालावलकर आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्याध्यापिका प्रतीक्षा शिरोडकर यांनी प्रमुख पाहुणे व सर्व समिती सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रस्ताविकात त्यांनी शालेय क्रीडा क्षेत्राचा आढावा सादर केला. त्याचबरोबर खेळांचे महत्त्व विषद केले. मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून क्रीडा महोत्सवाचे उद्‌घाटन झाले. पूर्व प्राथमिक व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी रिबन व्यायाम, डंबेल्स व्यायाम व पिरॅमिड सादर केले. यावेळी प्रमुख पाहुणे शैलेंद्र आरणीकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शालेय जीवनातील आठवणी सांगताना विविध खेळांचे महत्त्व देखील पटवून दिले. सुभाष मोर्ये यांनी विद्यार्थ्यांना खेळांची गरज सांगितली. निरोगी राहून शाळेतील विभाग, जिल्हा, राज्य पातळीवर कसे पोहोचवे, याबाबत मार्गदर्शन केले. लिंबू चमचा, बॅलन्स बुक, होपिंग रेस, बॉल इन द बास्केट, पोटॅटो रेस, लाँग जंप, पॅरामिड ग्लास, लंगडी, डॉजबॉल, रिले रेस, बॉल ओव्हर आर्म या खेळात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी मुख्याध्यापिका शिरोडकर, सहशिक्षिका वेलांकनी रॉड्रीग्स, तेजस्वी गावडे, प्राची परब उपस्थित होते. वेलंकनी रॉड्रीग्स यांनी सूत्रसंचालन केले. तेजस्वी गावडे यांनी आभार मानले.