दयासागर छात्रालयास अर्चना घारेंकडून वस्तू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दयासागर छात्रालयास
अर्चना घारेंकडून वस्तू
दयासागर छात्रालयास अर्चना घारेंकडून वस्तू

दयासागर छात्रालयास अर्चना घारेंकडून वस्तू

sakal_logo
By

६६४३८
रोणापाल ः येथील दयासागर छात्रालयात चिमुकल्यांसोबत अर्चना घारे-परब यांनी वाढदिवस साजरा केला.

दयासागर छात्रालयास
अर्चना घारेंकडून वस्तू
सावंतवाडी ः राष्ट्रवादी काँग्रेस कोकण विभागाच्या महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांचा वाढदिवस गुरुवारी (ता.१) मडुरे (ता.सावंतवाडी) येथील ऑल इंडिया मूव्हमेंट फॉर सेवा चेन्नईचे दयासागर छात्रालय, रोणापाल येथे विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत उत्साहात साजरा झाला.
अर्चना फाउंडेशनच्या माध्यमातून या छात्रालयाला आवश्यक धान्य वाटपही या निमित्ताने करण्यात आले. २००७ ला सुरू झालेल्या आज या छात्रालयमध्ये जिल्ह्यातील गरीब आणि गरजू असे एकूण ३० मुले-मुली शिक्षण घेत आहेत. ज्यामध्ये १३ मुले आणि ७ मुली येथे निवासी राहून शिक्षण घेत आहेत. आजपर्यंत एकूण ३०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी या छात्रालयातून शिक्षण घेतले आहे आणि यातील विद्यार्थी रेल्वे पोलिस, गोव्यातील नामवंत कंपनी तसेच डॉक्टर, इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. भविष्यात देखील या छात्रालयाला आवश्यक मदत केली जाईल, असे घारे-परब यांनी ग्वाही दिली. यावेळी त्यांनी छात्रालयाचे वॉर्डन रत्नप्रभा केळुसकर, केअरटेकर वैदही परब आणि व्यवस्थापाक त्रिवबा विर यांचे विशेष आभारही मानले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, महिला उद्योग व्यापार सेल जिल्हाध्यक्ष दर्शना बाबर-देसाई, शहराध्यक्ष देवा टेमकर, सूरज खान आणि मंगल कामत आदी उपस्थित होते.
---
६६४३२
सावंतवाडी ः बाल विज्ञान परिषदेत यश मिळविलेले विद्यार्थी.

‘मदर क्विन्स’ स्कूलचे यश
सावंतवाडी ः केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे आयोजित ‘राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद’ अंतर्गत ‘परिसंस्था आणि सामाजिक स्वाथ्य’ विषयावर सादरीकरणात जिल्ह्यातील प्राथमिक गटातून येथील मदर क्विन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळविले. यात युक्ता सापळे व जान्हवी कुडतरकर यांनी द्वितीय, श्रीपाद परब व विघ्नेश कोठावळे यांनी चौथा, माध्यमिक गटातून आर्या देसाई हिने व्दितीय क्रमांक पटकावला. या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय सादरीकरणासाठी निवड झाली आहे. यशस्वी विदयार्थ्यांचे सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष खेमसावंत भोसले, चेअरमन शुभदादेवी भोसले, कार्यकारी विश्वस्त लखम सावंत भोसले, युवराज्ञी श्रध्दाराजे भोसले व संस्थेच्या इतर पदाधिकाऱ्यांसह मुख्याध्यापिका अनुजा साळगावकर आदींनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
...................
६६४३३
मालवण ः सकल भंडारी संस्थेच्यावतीने आज वधू-वर नोंदणीचा प्रारंभ करण्यात आला.

भंडारी वधू-वरांसाठी मालवणात नोंदणी
मालवण : सकल भंडारी हितवर्धक संस्थेच्यावतीने ज्ञाती बांधवांसाठी वधू-वर नोंदणीचा प्रारंभ काल (ता. ३) तालुका भंडारी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात करण्यात आला. यावेळी प्रथम आलेल्या वराच्या नोंदणीचा प्रारंभ आचऱ्याचे उद्योजक जयप्रकाश परुळेकर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच वधू-वर नोंदणीच्या फलकाचे अनावरण आशीर्वाद कॅटरर्सचे मालक मोहन वराडकर यांच्या हस्ते झाला. यावेळी सकल भंडारी हितवर्धक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र तळाशीलकर, कार्यवाह पंकज पेडणेकर, भंडारी पतसंस्थेचे संचालक राजीव आचरेकर, सागर हडकर, सचिन आरोलकर, भूषण मयेकर, विनोद बिलये, रसिका तळाशीलकर, अश्विनी वायंगणकर, वराडकर, सुशील शेडगे, अजित गवंडी, सचिन गवंडी आदी मान्यवर, वधू-वरांचे पालक उपस्थित होते. सुशील शेडगे यांनी आभार मानले.
.............
66511
सावंतवाडी ः विविध पाककलाकृतींसह विद्यार्थिनी.

सेंट्रल स्कूलमध्ये ‘पाककलाकृती’
सावंतवाडी ः सेंट्रल इंग्लिश स्कूल या प्रशालेत काल (ता. ३) आरोग्यदायी पाककलाकृती बनविण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. प्रशालेतील केजी विभाग व पहिली ते दहावी या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने या उपक्रमांत सहभाग घेऊन विविध चविष्ट पदार्थ बनविले. यामध्ये विद्यार्थांनी भाज्या व फळे वापरून सँडविच, फळांचे ज्यूस, बिस्किट केक, बिस्किट सँडविच, भेळ, पाणीपुरी, दाबेली, मिल्कशेक, कॉफी, लिंबू सरबत, व्हेज फ्रॅन्की, कोशिंबीर, केळ्याचे शिकरण आदी पदार्थ शिक्षकांच्या मदतीने बनविले. या पदार्थांची सुंदर सजावट करून त्यांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. सावंतवाडी मर्कझी जमात मुंबई संस्थेचे अध्यक्ष इम्तियाज खानापुरी, उपाध्यक्षा निलोफर बेग, सचिव हिदायतुल्ला खान, प्रशालेच्या मुख्याध्यापिका निर्मला हेशागोळ आदी उपस्थित होते.
------
66519
श्री देवी माऊली

रोणापाल माऊली जत्रोत्सव उद्या
बांदा ः रोणापाल गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवारी (ता. ६) साजरा होणार आहे. सकाळी धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर ओटी भरणे, केळी-नारळ ठेवणे, नवस-बोलणे आदी होणार आहेत. रात्री पालखी मिरवणूक झाल्यानंतर आरोलकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. भाविकांनी व नाट्यरसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
---

माड्याचीवाडीत धार्मिक कार्यक्रम
कुडाळ ः माड्याचीवाडी येथील श्री देव गावडोबा मंदिरात बुधवारी (ता.७) दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी आठला श्रींची पूजा, अभिषेक, नऊला दत्त महाराजांची पूजा, दहाला धार्मिक कार्यक्रम व तीर्थप्रसाद, दुपारी एक ते सायंकाळी चार दरम्यान महाप्रसाद, पाचला वारकरी दिंडी, सातला महापुरुष मंडळ (पिंगुळी) यांचे भजन, रात्री आठला गोवर्धन मंडळ वेंगुर्ले-वडखोल यांचे भजन, भजने होणार आहेत.
---
वेत्ये येथील देवस्थानला लाखाची देणगी
सावंतवाडी ः वेत्ये येथील श्री देव कलनाथ पूर्वदेवी देवस्थानला शिवसेना नेते चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी एक लाखाची देणगी दिली. जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा धनादेश त्यांनी मंदिराच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. गावडे यांचे देवस्थान कमिटीकडून आभार मानले. यावेळी कौस्तुभ गावडे, नीलिमा गावडे, बाळू गावकर आदी उपस्थित होते.