रामचंद्र वालावलकर यांना ‘सेवामयी शिक्षक’ पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रामचंद्र वालावलकर यांना
‘सेवामयी शिक्षक’ पुरस्कार
रामचंद्र वालावलकर यांना ‘सेवामयी शिक्षक’ पुरस्कार

रामचंद्र वालावलकर यांना ‘सेवामयी शिक्षक’ पुरस्कार

sakal_logo
By

66437
रामचंद्र वालावलकर

रामचंद्र वालावलकर यांना
‘सेवामयी शिक्षक’ पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ४ ः अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, मालवण शाखेचा सेवामयी शिक्षक पुरस्कार माडखोल केंद्रप्रमुख (ता. सावंतवाडी) रामचंद्र वालावलकर यांना नुकताच जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण ८ जानेवारीला जिल्हा परिषद केंद्रशाळा, माडखोल येथे होणार आहे.
हा सोहळा उपशिक्षणाधिकारी प्राथमिक रामचंद्र आंगणे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सावंतवाडी गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, साहित्यिक विठ्ठल कदम, माडखोल नं. १ शाळा समिती अध्यक्ष विजय राऊळ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती निवड समिती अध्यक्ष सदानंद कांबळी यांनी पत्रकाद्वारे दिली. शिक्षण क्षेत्रात साने गुरुजींच्या विचाराने प्रेरित होऊन बालक, पालक आणि समाज यांच्यासाठी तन, मन, धन अर्पण करून सेवा केलेल्या शिक्षकास हा पुरस्कार प्रदान केला जातो. वालावलकर यांनी गेली ३३ वर्षे पेंडूर-मुगचीवाडी, पेंडूर नं. १ (मालवण), सुरंगपाणी (वेंगुर्ले) चौकुळ, माडखोल (सावंतवाडी) आदी शाळांत शिक्षक व केंद्रप्रमुख म्हणून कार्य केले. प्रत्येक शाळेत विविध शैक्षणिक उपक्रम राबवून शाळा आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विशेष प्रयत्न केले. प्रत्येक शाळेत आणि गावागावात ‘शाळा तेथे कथामाला’ हा उपक्रम राबविला. या पुरस्काराबाबत कथामाला मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.