गुहागर ः पालशेतची नदी वाहती होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुहागर ः पालशेतची नदी वाहती होणार
गुहागर ः पालशेतची नदी वाहती होणार

गुहागर ः पालशेतची नदी वाहती होणार

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat४p१.jpg ःKOP२२L६६४०० पालशेत ः या नदीचा प्रवाह थांबल्याने दुर्गंधी पसरली आहे.
---------------
पालशेतची नदी वाहती होणार?

बार्जमुळे अडले पाणी ; आमदार जाधवांकडून दखल, आज रत्नागिरीत बैठक
गुहागर, ता. ४ ः तालुक्यातील पालशेत बाजारपेठ पूल येथील समुद्रापर्यंत असलेल्या नदीमध्ये साचलेल्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. याबाबत शिवसेना पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी दखल घेत संबंधित बार्जच्या मालकाला संपर्क साधून पालशेत समुद्रकिनारी बार्जमुळे अडलेली पाण्याची वाट मोकळी करून देण्याच्या सूचना केल्या आहेत. याबाबत सोमवारी (ता. ५) रत्नागिरी येथे सहाय्यक बंदर निरीक्षक, मेरीटाईम बोर्ड व बार्जचे मालक यांची संयुक्त बैठक होणार आहे.
पालशेत बाजारपेठ पूल येथील समुद्रापर्यंत असलेल्या नदीमध्ये पाणी साचले आहे. दुर्गंधीयुक्त साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. येथील ग्रामस्थ शिवसेनेचे मिनार पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व विभागप्रमुख प्रवीण ओक, नरेंद्र नार्वेकर, रमेश नार्वेकर यांनी पालशेत समुद्रकिनाऱ्यावर पावसामध्ये वाहून आलेल्या महाकाय बार्जमुळे पाण्याचा प्रवाह बदलल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. बंद झालेल्या पाण्याच्या प्रवाहाचा मार्ग पूर्ववत करून द्यावा, अशी विनंतीदेखील करण्यात आली होती; परंतु, त्यानंतर याबाबत प्रशासनातर्फे कोणतीच कार्यवाही झाली नाही.
दरम्यान, या पाण्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन शिवसेना विभागप्रमुख प्रवीण ओक, माजी उपसभापती पांडुरंग कापले, स्थानिक शिवसेना पदाधिकारी यांनी आमदार भास्करराव जाधव यांच्याशी संपर्क साधून सदरील समस्या लक्षात आणून दिली. त्यावर आमदार जाधव यांनी सहाय्यक बंदर निरीक्षक, मेरीटाईम बोर्ड व बार्जचे मालक यांच्याशी संपर्क करून बार्जमुळे अडलेली पाण्याची वाट मोकळी करून देण्याचा निर्णय करून घेतला आहे. त्यामुळे लवकरच यावर मार्ग निघून साचलेले पाणी समुद्राला सोडले जाणार आहे. त्यामुळे पालशेतवासीयांची दुर्गंधीपासून मुक्तता होणार आहे.