
कणकवली जि.प. शाळेचे विविध स्पर्धांमध्ये यश
66462
कणकवली ः शहरातील जि.प.शाळेच्या मुलांचे शिक्षकांनी अभिनंदन केले.
कणकवली जि.प. शाळेचे
विविध स्पर्धांमध्ये यश
कणकवली,ता. ४ ः ‘बालकला, क्रीडा व ज्ञानी मी होणार’ महोत्सव अंतर्गत शहरातील विद्यामंदिर हायस्कूलच्या पटांगणावर झालेल्या केंद्रस्तरीय विविध स्पर्धांमध्ये जि. प. शाळा कणकवली रा.बा.उचले शाळा नंबर १ च्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. कबड्डी स्पर्धेत मोठ्या गटामध्ये जि.प.शाळा नंबर १ च्या मुलांचा संघ विजेता ठरला. रिले स्पर्धेतही मुलांच्या संघाने बाजी मारली.
१०० मीटर धावणे व गोळाफेक स्पर्धेत राकेश हुगार याने प्रथम क्रमांक पटकावला. अंजली जाधव हिने शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम तर गोळाफेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. रिले स्पर्धेत लहान गटात मुलींचा संघ विजेता ठरला. लांब उडीमध्ये रिया सोलंकी हिने प्रथम क्रमांक पटकावला. उंच उडी स्पर्धेमध्ये कावेरी जाधव हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला. या यशस्वी खेळाडूंचे केंद्रप्रमुख शुभांग दळवी, मुख्याध्यापक सायली गुरव, वर्षाराणी प्रभू, प्रियंका गोवेकर, साक्षी घाडीगांवकर, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व सदस्य, माता-पालक संघाचे दाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी अभिनंदन केले.