योगासन स्पर्धेत ‘कासार्डे’चे वर्चस्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

योगासन स्पर्धेत ‘कासार्डे’चे वर्चस्व
योगासन स्पर्धेत ‘कासार्डे’चे वर्चस्व

योगासन स्पर्धेत ‘कासार्डे’चे वर्चस्व

sakal_logo
By

66480
कासार्डे ः जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थांसोबत शिक्षक, आयोजक. (छायाचित्र : एन. पावसकर)

योगासन स्पर्धेत ‘कासार्डे’चे वर्चस्व

जिल्हास्तरीय स्पर्धा; विविध प्रकारांत नऊ विद्यार्थ्यांची बाजी

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ४ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग व महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन सिंधुदुर्ग आयोजित शालेय जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा नुकत्याच कासार्डे माध्यमिक विद्यालय, कासार्डे येथे पार पडल्या. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातून ८० पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते. यात विविध प्रकारात कासार्डे विद्यालयाच्या नऊ विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
योगासन स्पर्धा तीन गटात घेण्यात आल्या. महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन सिंधुदुर्गचे टेक्निकल प्रमुख व सहसचिव संजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हास्तरीय योग पंच रवींद्र पावसकर, श्वेता गावडे, नीता सावंत, आनंद परब, प्रकाश कोचरेकर, तेजल कुडतरकर आणि क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड आदींच्या सहकार्याने स्पर्धा पार पडल्या. क्रीडा अधिकारी मनीषा पाटील, महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्सचे सचिव डॉ. तुळशीराम रावराणे, कासार्डे विकास मंडळाचे स्थानीय कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतडकर, प्रभारी मुख्याध्यापक नारायण कुचेकर यांनी उपस्थिती दर्शवून शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेचा निकाल अनुक्रमे असा ः १४ वर्षांखालील मुली-दुर्वा पाटील (कासार्डे माध्यमिक), काव्य गोंडवळकर, अनुष्का आपटे (दोन्ही पोतदार इंटरनॅशनल, कणकवली), अस्मी राव (डॉन बॉस्को ओरोस), सान्वी कुऱ्हाडे (विद्यामंदिर कणकवली). १४ वर्षांखालील मुले ः कल्पेश निकम (कासार्डे माध्यमिक), हर्षल कानूरकर, नीतेश घोगळे (दोन्ही वराडकर हायस्कूल कट्टा), आयुष बागवे, किसन देसाई (दोन्ही आयडियल स्कूल वरवडे). १७ वर्षांखालील मुली-सानिका मत्तलवार (कासार्डे ज्युनिअर कॉलेज), संस्कृती मांजरेकर (मदर तेरेसा वेंगुर्ले), प्रज्योती जाधव (विद्यामंदिर कणकवली), समृद्धी माने (कासार्डे माध्यमिक), गौरी मिठबावकर (वराडकर इंग्लिश मीडियम कट्टा). १७ वर्षांखालील मुले-प्रदीप घाडगे (कासार्डे माध्यमिक), राजाराम सावंत (न्यू इंग्लिश स्कूल, पेंडूर). १९ वर्षांखालील मुली-रिया नकाशे (कासार्डे जुनिअर कॉलेज), नेहा पाताडे, कोमल पाताडे (दोन्ही कासार्डे जुनिअर कॉलेज), दीक्षा कदम (आवळेगाव हायस्कूल) मालिनी लाड (कासार्डे माध्यमिक). दरम्यान, हे सर्व खेळाडू कोल्हापूर (इचलकरंजी) येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत. महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्सचे सहसचिव संजय भोसले, सदस्य प्रकाश कोचरेकर, श्वेता गावडे, रवींद्र पावसकर, कासार्डे विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक नारायण कुचेकर आदींनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
---
इतर निकाल असा...
१९ वर्षांखालील मुले-मयूर हडशी (कासार्डे माध्यमिक). आर्टिस्टिक व रिदमिकमध्ये १४ वर्षांखालील मुलांमध्ये कल्पेश निकम (आर्टिस्टिक, कासार्डे माध्यमिक), १७ वर्षांखालील मुलींमध्ये गार्गी परळकर (विद्यामंदिर हायस्कूल, आर्टिस्टिक), सानिका मतलवार (रिदमिक, कासार्डे ज्युनिअर कॉलेज), १९ वर्षांखालील मुलींमध्ये रिया नकाशे (रिदमिक, कासार्डे जुनिअर कॉलेज).