
मालगुंड विद्यालयाने पटकावली जनरल चॅम्पियनशिप
rat०४२५.txt
(पान २ साठी)
(फोटो नाही मिळाला)
फोटो ओळी
-rat४p२०.jpg-
चाफे (ता. रत्नागिरी) ः क्रीडा महोत्सवात विजेत्य मालगुंड विद्यालयाला जनरल चॅम्पियनशिप प्रदान करताना संस्थेचे चेअरमन सुनील मयेकर.
मालगुंड विद्यालयाने पटकावली जनरल चॅम्पियनशिप
पावस, ता. ५ः रत्नागिरी तालुक्यातील मोहिनी मुरारी शिक्षण संस्थेचे संस्थापक (कै.) डॉ. नानासाहेब मयेकर यांच्या जयंतीनिमित्त क्रीडा स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेत सर्वाधिक गुणांची आघाडी घेऊन डॉ. नानासाहेब मयेकर जनरल चॅम्पियनशिप मालगुंड येथील बळीराम परकर विद्यालयाने पटकावली. संस्थेचे चेअरमन सुनील मयेकर यांच्या हस्ते त्यांना चषक सुपूर्द करण्यात आला.
हा क्रीडा महोत्सव चाफे मयेकर महाविद्यालयात झाला. महोत्सवामध्ये सांघिक व वैयक्तिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या विविध स्पर्धांमध्ये मालगुंड विद्यालयाने सर्वाधिक २६ बक्षिसे मिळवून प्रथम क्रमांकांची चॅम्पियनशिप पटकावली. स्पर्धेत मालगुंड, जाकादेवी, चाफे, काजुर्ली प्रशालेतील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक स्तरावरील गट स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.
पारितोषित वितरणाला मालगुंड शिक्षण संस्थेचे सचिव विनायक राऊत, संचालक किशोर पाटील, कोषाध्यक्ष संदीप कदम, नंदकुमार साळवी आदी उपस्थित होते.