
पावस गणपती मंदिराजवळ घाट बांधण्यास सुरवात
rat०४३०.txt
(पान एक साठी)
फोटो ओळी
-rat४p२३.jpg-
६६५०२
पावस ः पावस गणपती मंदिराजवळ घाट बांधण्याच्या कामाला सुरवात झाली आहे.
पावस गणपती मंदिराजवळ घाट बांधण्यास सुरवात
सकाळ वृत्तसेवा ः
पावस, ता. ५ ः उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पावस गणपती मंदिर घाट बांधण्यासाठी प्रादेशिक पर्यटन कार्यक्रमांतर्गत १९ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाला सुरवात झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे
पावस येथील गौतमी नदीमध्ये पावसाळ्यामध्ये पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे पावस नालेवठार परिसरातील ग्रामस्थांना पुराच्या पाण्यामुळे गणपती विसर्जन करणे अडचणीचे होते. यासाठी गणपती मंदिराजवळ गौतमी नदीमध्ये घाट बांधण्यात यावा, अशी मागणी अनेक दिवस सुरू होती. अखेर नवलादेवी मंदिर परिसरात नुतनीकरण्यासाठी उद्योगमंत्री सामंत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे निधी प्राप्त करून दिला. या दोन्ही ठिकाणच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर नवलादेवी मंदिर परिसरात बांधकामाला सुरवात झाली आहे. त्यानंतर गणपती मंदिर घाटाचे कामही सुरू झाले आहे. या कामासाठी प्रादेशिक पर्यटन कार्यक्रमांतर्गत १९ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गणपती मंदिर व नवलादेवी मंदिर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना क्षणभर विश्रांतीसाठीही या घाटाचा उपयोग होणार आहे.