रत्नागिरी-बीट परीक्षेसाठी 2 हजार 649 विद्यार्थी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-बीट परीक्षेसाठी 2 हजार 649 विद्यार्थी
रत्नागिरी-बीट परीक्षेसाठी 2 हजार 649 विद्यार्थी

रत्नागिरी-बीट परीक्षेसाठी 2 हजार 649 विद्यार्थी

sakal_logo
By

बीट परीक्षेसाठी २ हजार ६४९ विद्यार्थी

नासा, इस्त्रो भेटी उपक्रम ः २७ हजार ७१९ विद्यार्थ्यांनी दिली चाळणी परीक्षा

रत्नागिरी, ता. ४ ः अंतराळाचा अभ्यास करणाऱ्या नासा, इस्त्रोसारख्या संस्थांना भेटी देण्याचा उपक्रम जिल्हा परिषदेने हाती घेतला आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या २५१ केंद्रात चाळणी परीक्षा घेण्यात आली. यामध्ये पावणेतीन हजार शाळांमधील २३ हजार ७१९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २ हजार ६४९ विद्यार्थी बीटस्तरीय परीक्षेसाठी निवडण्यात आले आहेत.
जिल्हा परिषद शाळांमधून अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमधून अव्वल दर्जाचे अधिकारी घडत आहेत. ग्रामीण भागातील काही विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासक, वैज्ञानिक किंवा संशोधक घडण्याची क्षमता असते. अशा विद्यार्थ्यांना शोधून काढून त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी शिक्षण विभागाने नासा, इस्त्रोसारख्या संशोधन संस्था विद्यार्थ्यांना पाहता याव्यात यासाठी कार्यक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमासाठी अभ्यासू विद्यार्थी निवडले जाणार आहेत. केंद्र, बीट, तालुका आणि जिल्हा अशा चार स्तरावर परीक्षा घेऊन त्यामधून नासासाठी ९ तर इस्त्रोसाठी २७ विद्यार्थी निवडले जातील. यामध्ये विद्यार्थिनींचाही समावेश असेल. मुलांच्या निवडीसाठी ३० नोव्हेंबरला केंद्रस्तरावर चाळणी परीक्षा घेण्यात आली. यामध्ये ५ ते ८ वी पर्यंतचे २७ हजार विद्यार्थी सहभागी होणार होते. परीक्षेला जिल्हाभरातील केंद्रस्तरावरून मराठी माध्यमाचे २२ हजार २६, तर उर्दू माध्यमाचे १,६९३ विद्यार्थी बसले होते. त्यातून मराठी माध्यमाचे २ हजार ५४९ तर उर्दू माध्यमाचे ९१ विद्यार्थ्यांची निवड बीटस्तरीय परीक्षेसाठी करण्यात आली आहे. त्यापुढे तालुकास्तरावरील परीक्षेसाठी ५५० विद्यार्थी निवडण्यात येणार असून यामधून जिल्हास्तरीय परिक्षेसाठी ९० जणांना संधी मिळेल.
------------
चौकट
* केंद्रस्तरावर परीक्षा दिलेल्या विद्यार्थी संख्याः
तालुका*मराठी*उर्दू
* मंडणगड*९५८*१९८
* दापोली*२३९८*३३७
* खेड*२४३७*८९
* चिपळूण *३१२९*१९५
* गुहागर *२४८३*१६३
* संगमेश्वर* २८२४*३९
* रत्नागिरी*२९५५*२९०
* लांजा*२२९५*९३
* राजापूर*२५२०*२८९
------------
चौकट
बीटस्तरावरील परीक्षेसाठी निवडण्यात आलेले विद्यार्थी संख्याः

तालुका*विद्यार्थीं
* मंडणगड*१६३
* दापोली*२८२
* खेड*३७०
* चिपळूण*३६३
* गुहागर*२०६
* संगमेश्वर*३८०
* रत्नागिरी*३०१
* लांजा*२१०
* राजापूर*३६४