केंद्रप्रमुखांची पदे भरण्यासाठी फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केंद्रप्रमुखांची पदे भरण्यासाठी फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला
केंद्रप्रमुखांची पदे भरण्यासाठी फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला

केंद्रप्रमुखांची पदे भरण्यासाठी फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला

sakal_logo
By

rat०४२३.txt

(टुडे पान तीन मेन)

केंद्रप्रमुखांची पदे भरण्यासाठी फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला

शालेय शिक्षण, क्रीडा विभाग ; पदोन्नतीसह, विभागीय स्पर्धा परीक्षेने भरणार पदे
सकाळ वृत्तसेवा ः
चिपळूण, ता. ५ ः मागील अनेक वर्षापासून रिक्त असलेली शालेय शिक्षण विभागातील केंद्रप्रमुखांची रिक्त पदे आता ५० टक्के पदोन्नतीने व ५० टक्के विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यात येणार आहेत. याबाबतचा शासन आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १ डिसेंबरला निर्गमित केला आहे.
एका समुहातील अर्थात केंद्रातील संपूर्ण जिल्हा परिषद शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, जिल्हा परिषद तसेच इतर शाळांचे संनियंत्रण करणे, वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व व्यक्तिमत्व विकासाला चालना देणे, शिक्षकांना योग्य त्या ठिकाणी मार्गदर्शन करणे, लोकसहभागातून शाळा विकास करणे, शिक्षण विभाग व शाळा यांमधील दुवा म्हणून काम करणे आदी स्वरूपांच्या जबाबदाऱ्या असणाऱ्या केंद्रप्रमुखांनी १९९५ पासून शैक्षणिक गुणवत्ता वाढविली आहे. त्यावेळेस प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण या उद्देशासाठी केंद्रप्रमुखांची पद निर्मिती करण्यात आली होती. ते उद्दिष्ट शंभर टक्के साध्य झाल्यानंतर शासनाने केंद्रप्रमुखांची उपयोगिता लक्षात घेऊन ही पदे कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. राज्यात एकूण ४ हजार ८६० केंद्रप्रमुखांची मान्य पदे असून आजघडीला केवळ १२०० पदे कार्यरत आहेत. त्यामुळे कार्यरत केंद्रप्रमुखांवर अतिरिक्त केंद्रांचा प्रभार देण्यात आला आहे. ही रिक्त पदे भरण्याबाबत महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघाने वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेऊन शासनाने अखेर केंद्रप्रमुखांच्या रिक्त जागा ५० टक्के पदोन्नतीने व ५० टक्के विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विविध जिल्हा परिषदांमध्ये केंद्रप्रमुखांची पदे भरण्याबाबत यापूर्वी केलेली कार्यवाही वैध ठरवण्यात आली असून एखाद्या जिल्ह्यात पदोन्नतीची पदे ५० टक्के पेक्षा जास्त पदे भरली गेल्यास ती पदे जशी रिक्त होतील तशी विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे भरल्या जाणार आहेत. विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे ही पदे भरण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत पदवीधर प्रशिक्षित शिक्षकांनाच या परीक्षेसाठी बसता येणार आहे. पदवी परीक्षेला किमान ५० टक्के गुणांची अट या परीक्षेसाठी लावण्यात आली असून त्यासाठीचा अभ्यासक्रम शासन आदेशात नमूद केला आहे.

कोट
राज्यातील केंद्रप्रमुखांच्या जवळपास ३५०० रिक्त जागा भरल्या जाणार असून अतिरिक्त प्रभार सांभाळणाऱ्या केंद्रप्रमुखांचा ताण कमी होणार आहे. रिक्त जागा भरण्याबाबत महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघाने मागील दोन वर्षापासून राज्याध्यक्ष अशोकराव महाले यांच्या नेतृत्वात पाठपुरावा केला असून विद्यमान शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या भेटी देखील घेतल्या होत्या. त्याशिवाय खासदार भावनाताई गवळी यांनी देखील महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघाच्या म्हणण्यानुसार शिक्षण मंत्र्यांशी चर्चा केली होती.
--बाबाजी शिर्के, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ, रत्नागिरी