चिपळूण-संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-संक्षिप्त पट्टा
चिपळूण-संक्षिप्त पट्टा

चिपळूण-संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

पान ५ साठी, संक्षिप्त
आबिटगाव शाळेचे यश
चिपळूण ः आबिटगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील मुलींच्या १७ वर्षांखालील संघाने जिल्हा पातळीवर द्वितीय क्रमांक प्राप्त केला. श्रद्धा लांबे, प्रगती दुर्गावले, आर्या दुर्गावले, भक्ती भागडे, श्रेया भागडे, सानिका भागडे, पुनम पाष्टे, समृद्धी भागडे, संघवी भागडे, ऐश्वर्या पाचकुडे, वैष्णवी कातकर, मधुरा शिर्के, श्रुती खेराडे, श्रुती भागडे, दिक्षा खेराडे यांनी उत्तम कामगिरी केली. यापैकी जिल्हा विभागातून प्रगती दुर्गावले आणि मधुरा शिर्के यांची सतरा वर्षाखालील वयोगटातून जिल्हा संघात निवड झाली आहे. सह्याद्री शिक्षण संस्थे संचालक आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री. मोरे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

६६५१०
rat४p२४.jpg

चिपळुणात दिव्यांग मेळावा
चिपळूण : चिपळूण तालुका अपंग सेवा संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या दिव्यांग मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मेळाव्याला ३५० दिव्यांग बांधवांनी उपस्थिती दर्शविली. आमदार शेखर निकम यांचे हस्ते दीपप्रज्वलन व शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. चिपळूण तालुका अपंग सेवा संस्थेचे सचिव संतोष होळकर यांनी अपंगांच्या अवश्यक अशा मागण्या मांडल्या. आमदार शेखर निकम यांनी दिव्यांग बांधवांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

कुशिवडेत उद्यापासून दत्तजयंती
चिपळूण ः तालुक्यातील कुशिवडे येथील श्री दत्तगुरु सेवा मंडळातर्फे ६ ते ८ डिसेंबरपर्यंत दत्तजयंती सोहळा होणार आहे. ६ ला पहाटे ४ वाजता काकड आरती, १० वाजता श्रीदत्त माऊलींना अभिषेक, सायंकाळी ६ वाजता आरती, ७ ते ८ हरिपाठ, रात्री १२ वाजता श्री सद्गुरु सेवा मंडळाचे भजन, ७ ला सायंकाळी ४ वाजता हरिपाठ, सायंकाळी ६ वाजता श्री दत्त माऊलींचा जन्मोत्सव, दिंडी प्रदक्षिणा व आरती, रात्री ८ वाजता महाप्रसाद, रात्री १० वाजता श्री दत्तगुरु सेवा मंडळातील मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, ८ ला पहाटे ४ वाजता काकड आरती, दुपारी १२ ते २ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी ३ ते ४ हळदीकुंकू समारंभ, रात्री ७ ला आरती, रात्री ८ वाजता महाप्रसाद, रात्री ९ वाजता लकी ड्रॉ व सत्कार सोहळा, रात्री १० वाजता दोन अंकी नाटक प्रेमाचा गोलमाल.


६६५१२

-rat४p२५.jpg

विद्यार्थ्यांनी घेतला आकाशदर्शनाचा आनंद
चिपळूण ः केतकी येथील सेवासाधना प्रतिष्ठान, खेर्डीतील न्यू इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने सायंकाळी ६.३० ते रात्री ९.३० या वेळेत आकाशदर्शन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विद्यालयातील पाचवी ते नववीमधील एकूण ५० विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. सेवासाधना प्रतिष्ठानचे विनित वाघे यांनी स्लाइड शो च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अवकाश, ग्रह, तारे, नक्षत्रे यांची माहिती दिली. त्यानंतर घेतलेल्या माहितीचा पडताळा दुर्बिणीच्या साह्याने प्रत्यक्ष ग्रह दाखवून दिला. चंद्र, गुरू, शनि अशा ग्रहांचे दर्शन घडविले. मुख्याध्यापक संजय वरेकर यांच्या प्रेरणेतून विज्ञान शिक्षक शिवाजी पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमात पर्यवेक्षक काळुगडे, राजेंद्र पवार, संतोष हातणकर, समीर पिलवलकर, आनंद भुवड, संदेश शिगवण यांनी प्रत्यक्ष सहभागी होऊन आकाश दर्शनाचा लाभ घेतला.

-rat४p२६.jpg

६६५१३
सती विद्यालयाचे तायक्वॉंदो स्पर्धेत सुयश
चिपळूण ः खेर्डी-सती येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजने जिल्हास्तरीय तायक्वॉंदो स्पर्धेमध्ये यश मिळवले. विद्यालयातील बारावीचा विद्यार्थी मोहम्मद कैफ रफिक खानने प्रथम क्रमांक संपादन केला. त्याची निवड सातारा येथे होणाऱ्या कोल्हापूर विभागीय तायक्वॉंदो स्पर्धेसाठी झाली आहे. त्याचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शेखर निकम, संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, ज्येष्ठ संचालक खानविलकर, सचिव महेश महाडिक, विद्यालयाचे प्राचार्य संजय वरेकर, उपमुख्याध्यापक अमर भाट, पर्यवेक्षक काळगुडे यांनी अभिनंदन केले. विजयी संघास विद्यालयाचे क्रीडा शिक्षक महेश सावंत, विनय गोठणकर, प्रशांत मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.