
खेड-खेडमध्ये अनधिकृत पार्किंग
खेडमध्ये अनधिकृत पार्किंग
कॉंग्रेसचे पोलिसांना निवेदन ; कारवाईची मागणी
खेड, ता. ४: शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत पार्किंगचे प्रमाण वाढत आहे. बस स्थानक, तीनबत्ती नाका, खेड बाजारपेठ येथे
दुचाकी, रिक्षा, मोटारी मनमानी पद्धतीने पार्क केली जातात. त्यामुळे वाहतुकीस व पादचाऱ्यांना त्रास होत आहे. यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी काँग्रेसच्या वतीने येथील पोलिस निरीक्षकांकडे करण्यात आली आहे.
खेड बस स्थानकापासून दापोली रोडपर्यंत व मुख्य बाजार एसटी स्थानक ते सिद्धिविनायक मंदिर हा रस्ता अरुंद असल्यामुळे एखादे वाहन रस्त्यालगत उभे असल्यास वाहतुकीस अडचणी निर्माण होतात. खेड बाजारपेठेमध्ये गांधी चौक येथे वाहनांवर कारवाई करणे सोपे जावे यासाठी सीसीटीव्ही बसवलेले आहेत. मात्र या यंत्रणेचा सुव्यवस्थित वापर केला जात नसल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर शहरामध्ये वाहतूक पोलिस अशा वाहनांवर कारवाही करताना दिसून येत नाहीत. या विषयाचा गांभीर्याने विचार करून सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत करून बाजारपेठ, बस स्थानक व तीनबत्ती नाका या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलिस नियुक्त करावा. खेड बाजारपेठेतील एक दिशा मार्ग पुन्हा सुरू करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या प्रसंगी रत्नागिरी जिल्हा काँग्रेस पर्यावरण विभाग जिल्हाध्यक्ष किरण तायडे, एनसीडब्ल्यूसीचे उपाध्यक्ष बशीर मुजावर, काँग्रेस युवक तालुका अध्यक्ष स्वराज गांधी, महिला तालुकाध्यक्ष सीमा शिंदे, सरचिटणीस खलील सुर्वे, रियाना जस्नाईक, तौफिक पोत्रिक, भैय्या निकम उपस्थित होते.