रत्नागिरी-राज ठाकरेंच्या स्वागतावेळी गटबाजीचे दर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-राज ठाकरेंच्या स्वागतावेळी गटबाजीचे दर्शन
रत्नागिरी-राज ठाकरेंच्या स्वागतावेळी गटबाजीचे दर्शन

रत्नागिरी-राज ठाकरेंच्या स्वागतावेळी गटबाजीचे दर्शन

sakal_logo
By

rat४p२१.jpg- KOP२२L६६५०० रत्नागिरी ः राज ठाकरेंचे रत्नागिरीत स्वागत करताना मनसैनिक.
--------
राज ठाकरेंच्या स्वागतावेळी गटबाजीचे दर्शन

दोन गटांकडून स्वतंत्र औक्षण ; विधानसभा कार्यालयाचे उदघाटन

रत्नागिरी, ता.४ ः कोकण दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे रत्नागिरीत जल्लोषात स्वागत झाले. मनसेच्या तरुण कार्यकर्त्यांची उपस्थित लक्षणीय होती. शनिवारी (ता. ३) रात्री मनसेतील दोन स्वतंत्र गट राज ठाकरे यांच्या औक्षणासाठी शासकीय विश्रामगृहात उपस्थित होते. थेट पक्षाध्यक्षांच्या दौऱ्यात दोन गट असल्याची चर्चा सुरू होती.
कोकणातील मनसेला उर्जितावस्थेत आणण्यासाठी राज ठाकरे यांनी सिंधुदुर्ग, रत्नागिरी असे दोन्ही जिल्ह्यांचे दौरे केले. राजापूर, लांजामार्गे शनिवारी रात्री रत्नागिरी शहरात दाखल झाले. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी करत वातावरण निर्मिती केली. भगवे झेंडे, भलमोठे बॅनर यामुळे रत्नागिरीकरांचे आकर्षण बनले होते. यामध्ये मनसेत गट-तट असल्याचे दिसत होते.
शनिवारी रात्री शासकीय विश्रामगृहात रत्नागिरी ग्रामीण व शहर अशा दोन गटांनी राज ठाकरे यांचे औक्षण केले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांची गर्दी होती. रविवारी सकाळीही शासकीय विश्रामगृहावर मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ कार्यालयाचे उद्घाटन झाले. दरम्यान, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी राज ठाकरे यांची भेट घेत रत्नागिरीत त्यांचे स्वागत केले. यावेळी मुन्ना देसाई, अजित चिकटे आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.