Wed, Feb 1, 2023

दाभोळ-मुरुडमधील शासकीय जागेतील बांधकाम तोडण्यास सुरवात
दाभोळ-मुरुडमधील शासकीय जागेतील बांधकाम तोडण्यास सुरवात
Published on : 4 December 2022, 1:59 am
पान 3 साठी, संक्षिप्त)
मुरुडमधील शासकीय
जागेतील बांधकामावर हातोडा
दाभोळ ः तालुक्यातील मुरुड समुद्र किनाऱ्यावरील सी कॉच रिसॉर्ट तोडल्यानंतर आता साई रिसॉर्ट समोरील शासकीय जागेत अतिक्रमण केलेले बांधकाम तोडण्यास सुरवात झाली आहे. तहसीलदारांनी नोटीस बजावल्यानंतर हे काम केले जात असल्याची माहिती पुढे आली आहे. साई रिसॉर्ट प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने अजूनही या रिसॉर्टच्या पाडकामाला प्रत्यक्ष सुरवात झालेली नाही. पण याच रिसॉर्टसमोरील शासकीय जागेत अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी दापोली तहसीलदारांनी संबंधित मालकांना नोटीस बजावल्यानंतर ते बांधकाम तोडण्याचे काम संबंधित मालकाने स्वतःहून सुरू केले आहे.