दाभोळ-बहुचर्चित साई रिसॉर्टचे पाणी थेट समुद्रात सोडलेले नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ-बहुचर्चित साई रिसॉर्टचे पाणी थेट समुद्रात सोडलेले नाही
दाभोळ-बहुचर्चित साई रिसॉर्टचे पाणी थेट समुद्रात सोडलेले नाही

दाभोळ-बहुचर्चित साई रिसॉर्टचे पाणी थेट समुद्रात सोडलेले नाही

sakal_logo
By

साई रिसॉर्टचे पाणी थेट समुद्रात सोडलेले नाही
अधिकाऱ्यांचा अहवाल ; टाकीत सोडल्याचे स्पष्ट
दाभोळ, ता. ४ ः दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील साई रिसॉर्ट प्रकरण गेले अनेक दिवस वादात सापडले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या रिसॉर्टचे पाणी थेट समुद्रात सोडण्यात येत असल्याने पर्यावरणाची हानी होत असल्याचे ट्विट केले होते. या ठिकाणी महसूल, पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी पाहणी करून गेले. त्यावेळी साई रिसॉर्टचे पाणी थेट समुद्रात सोडण्यात आले नसल्याचे पाहणीत दिसून आले आहे. यापूर्वीच दापोली उपविभागीय अधिकारी यांनीही शासनाला अहवाल सादर केला होता. रिसॉर्टपासून काही अंतरावर सांडपाणी विल्हेवाट लावण्यासाठी टाकी आढळून आली आहे. परंतु समुद्रापासून काही अंतरावर बांधण्यात आली असल्याने त्या टाकीला कोणतीही पाईप जोडून समुद्रात थेट पाणी सोडण्यात आले नसल्याचे दिसून आल्याने सोमय्या यांनी केलेला दावा फोल ठरला जाण्याची शक्यता आहे.