रत्नागिरी-बाळासाहेबांची शिवसेना-भाजप युती अधांतरीच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-बाळासाहेबांची शिवसेना-भाजप युती अधांतरीच
रत्नागिरी-बाळासाहेबांची शिवसेना-भाजप युती अधांतरीच

रत्नागिरी-बाळासाहेबांची शिवसेना-भाजप युती अधांतरीच

sakal_logo
By

ग्रामपंचायत रणधुमाळी--लोगो


बाळासाहेबांची शिवसेना-भाजप युती अधांतरीच
चुरस वाढली; बहुसंख्य जागांवर भाजपचे उमेदवार रिंगणात
रत्नागिरी, ता. ४ ः तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरुन झाले तरीही बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप यांच्यातील युतीचा निर्णय अधांतरीच असल्याचे चित्र दिसत आहेत. २९ पैकी सुमारे चौदा गावांत भाजपने सरंपचपदासाठी तर सदस्यपदासाठी बहुसंख्य जागांवर उमेदवारी अर्ज भरले आहेत. दोन शिवसेना आमनेसामने असतानाच भाजपनेही उडी घेतल्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना असे दोन पक्ष झाल्यानंतर एकाचवेळी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीला महत्व प्राप्त झाले आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री उदय सामंत यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून गेल्या काही दिवसात त्यांनी प्रत्येक पदाधिकाऱ्यांकडे जबाबदाऱ्या निश्‍चित करुन दिल्या. रत्नागिरी तालुक्यात सरपंचांच्या २९ जागांसाठी ८६ अर्ज तर २४९ सदस्यांच्या जागांसाठी ४२९ अर्ज भरले गेले आहेत. बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या कमी आहे. बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप यांची युती होईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. तालुक्यातील ग्रामीण भागात मोजकी गावे वगळता अन्यत्र भाजपचे वर्चस्व नाही. मात्र राज्याच्या सत्तेत असल्यामुळे भाजपकडून संपुर्ण ताकदीने ग्रामपंचायतीत उतरण्यावर भर दिला गेला आहे. बहुसंख्य ठिकाणी उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे शिंदे गट आणि भाजप यांची युतीचा निर्णय होऊ शकलेला नाही. अर्ज माघारीनंतर परिस्थिती पाहूनच युतीचा निर्णय होईल असे भाजपच्या वर्तुळातून सांगण्यात येत आहे. त्यामुळे निवडणुकीमधील चुरस वाढली असून सर्वच पक्ष आपापल्यापरिने उमेदवार निवडून आणण्यासाठी ताकद पणाला लावत आहेत.
दरम्यान, तालुक्यात उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाकडे तळागाळात असलेल्या कार्यकर्त्यांच्या फळीमुळे उमेदवार उभे करण्यास मोठी कसरत करावी लागली नसल्याची चर्चा सुरू आहे. गाजावाजा न करता कार्यकर्त्यांची फळी कार्यरत आहे. त्याचा किती फायदा त्यांना होईल हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. तालुक्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची ताकद अल्प असल्यामुळे शक्य तिथे उमेदवार उभे करण्यावर भर दिला आहे.

कोट
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पूर्ण ताकदीने उतरलेली आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाबरोबर युतीचा निर्णय अजुनही झालेला नाही. उमेदवारी अर्ज माघारीनंतरच चित्र स्पष्ट होईल.
-अ‍ॅड. दीपक पटवर्धन, जिल्हाध्यक्ष, भाजप