
मुळदेच्या सरपंचपदी मुळदेकर बिनविरोध
66533
कुडाळ ः मुळदे सरपंचपदी संध्या वासुदेव मुळदेकर बिनविरोध झाल्याने त्यांच्या अभिनंदनप्रसंगी आमदार वैभव नाईक.
मुळदेच्या सरपंचपदी
मुळदेकर बिनविरोध
आमदार नाईक यांची घोषणा
कुडाळ, ता. ४ ः आंबडपाल (ता.कुडाळ) ग्रामपंचायतीपाठोपाठ आता मुळदे सरपंचपद बिनविरोध उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडे गेले आहे. मुळदे सरपंचपदी संध्या मुळदेकर यांची बिनविरोध म्हणून वर्णी लागणार असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.
आंबडपाल सरपंचपदी काल (ता.३) बिनविरोध म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश मेस्त्री यांची निवड झाली आहे. त्यानंतर आज उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला आणखी एक धक्का देत मुळदे सरपंचपद बिनविरोध आपल्या ताब्यात घेतले. आज सायंकाळी कुडाळ शिवसेना कार्यालय येथे मुळदे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मुळदेकर यांची बिनविरोध तर योगिता माळकर यांची सदस्य म्हणून वर्णी लागल्याबद्दल खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक यांनी विशेष अभिनंदन केले. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, उप जिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, महिला अध्यक्षा जान्हवी सावंत, कुडाळ तालुकाध्यक्ष राजन नाईक, बबन बोभाटे, रुपेश पावसकर, सुशील चिंदरकर, किरण शिंदे, मिलिंद नाईक, दीपक आंगणे, गोट्या चव्हाण, बंड्या कोरगावकर, स्वप्नील शिंदे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.