शिंदेंचे हे स्थगिती सरकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिंदेंचे हे स्थगिती सरकार
शिंदेंचे हे स्थगिती सरकार

शिंदेंचे हे स्थगिती सरकार

sakal_logo
By

66573
कुडाळ ः ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना खासदार विनायक राऊत. सोबत आमदार वैभव नाईक, अरुण दुधवडकर आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)

शिंदेंचे हे स्थगिती सरकार

विनायक राऊत ः ठाकरे गटाला सिंधुदुर्गात प्रतिसादाचा दावा

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ४ ः राज्यातील विद्यमान शिंदे-फडणवीस सरकार हे स्थगिती सरकार आहे. या सरकारने अनेक विकासकामांना स्थगिती देण्याचे काम केले आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव तथा खासदार विनायक राऊत यांनी आज केली.
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध तालुक्यात दौरा केला असून गावागावांत सर्वत्र शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातही चांगला प्रतिसाद मिळत असून या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतींवर शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचा झेंडा फडकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ग्रामपंचायत निवडणुकीच्या खासदार राऊत यांनी रविवारी येथील शिवसेना शाखेत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत आढावा घेतला. यावेळी संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, महिला आघाडी जिल्हा संघटक जान्हवी सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, युवासेना जिल्हाप्रमुख तथा कुडाळचे उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर, नगरसेवक किरण शिंदे, माजी उपसभापती जयभारत पालव, माजी पंचायत समिती सदस्य मिलिंद नाईक, युवासेनेचे सुशील चिंदरकर, केशव (आबा) मुंज, मिलिंद परब, पिंगुळी सरपंच निर्मला पालकर, गोट्या चव्हाण आदींसह तालुक्यातील पदाधिकारी, उमेदवार तसेच शिवसैनिक उपस्थित होते.
खासदार राऊत म्हणाले, "राज्यातील विद्यमान शिंदे-फडणवीस सरकार हे स्थगिती सरकार आहे. या सरकारने अनेक विकासकामांना स्थगिती देण्याचे काम केले आहे. त्यामुळे या सरकारला ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून योग्य तो धडा शिकवूया. या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासह महाविकास आघाडीची ताकद दाखवून देण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हा. जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर आपले सरपंच आलेच पाहिजेत, असा निर्धार करून सर्वांनी काम करा. तुम्ही सर्वजण कार्यक्षम आणि मेहनत घेणारे शिवसैनिक आहात. आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत. त्यामुळे या ग्रामपंचायत निवडणुकीत जास्तीत जास्त शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे पॅनल उभे करण्याचा प्रयत्न करा. शिवसेना (ठाकरे गट) आणि मित्रपक्ष असे मिळून महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढविली जात आहे. जेथे मित्रपक्षांची ताकद आहे, तेथे मित्रपक्षांना सोबत घेऊन महाविकास आघाडी मजबूत करा. या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट व महाविकास आघाडी निश्चितच राज्यातील स्थगिती शिंदे-फडणवीस सरकारला धडा शिकवेल."
--
शिंदे गटाची अवस्था दयनीय
ते पुढे म्हणाले, ‘‘जिल्ह्यात शिंदे गटाची दयनीय अवस्था झाली आहे. भाजपाने शिंदे गटाचे ग्रामपंचायत निवडणुकीत विसर्जन केले आहे. जिल्ह्यात मोजक्याच ठिकाणी शिंदे गट निवडणूक रिंगणात उतरला आहे. बाकी सर्वत्र शिंदे गट विरुद्ध भाजपा लढत आहेत. जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडी भक्कमपणे ग्रामपंचायत निवडणूक रिंगणात उतरली असून, शिवसेना आणि महाविकास आघाडीची ताकद या निवडणुकीत दाखवून देण्यासाठी सर्वांनी काम करा.’’