फेरीवाल्‍यांना ‘स्‍वनिधी’चे साह्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फेरीवाल्‍यांना ‘स्‍वनिधी’चे साह्य
फेरीवाल्‍यांना ‘स्‍वनिधी’चे साह्य

फेरीवाल्‍यांना ‘स्‍वनिधी’चे साह्य

sakal_logo
By

फेरीवाल्‍यांना ‘स्‍वनिधी’चे साह्य
मुंबादेवी ः मुंबई महापालिकेतर्फे फेरीवाल्यांच्या १० हजार रुपयांचे अनुदान देण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने पंतप्रधान स्वनिधी योजना राबवण्यात येत आहे. ही योजना पालिकेच्या २४ वॉर्डांत राबवली जात असून आतापर्यंत जवळपास ५१ हजार फेरीवाल्‍यांचे अर्ज भरून घेतले आहेत. पालिकेने एक लाख फेरीवाल्‍यांच्या नोंदणीचे लक्ष्‍य ठेवले असून ते पूर्ण होईपर्यंत अर्ज भरून घेण्याचे काम सुरूच राहील, अशी माहिती मुंबई महापालिकेचे नवनियुक्त अनुज्ञापन अधीक्षक प्रकाश जाधव यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. जाधव यांनी सांगितले, की आतापर्यंत जवळपास ५१ हजार फेरीवाल्यांचे अर्ज प्राप्त झाले असून पुढील काही दिवसांमध्ये ४९ हजार फेरीवाल्यांचे अर्ज भरून घेण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल अशी आशा आहे. मुंबई महापालिकेला मिळालेले अर्ज केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत पथ विक्रेत्यांसाठी सूक्ष्म पुरवठा म्हणून दहा हजार रुपये देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. केंद्राची ही योजना राज्य सरकारच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांकडून राबवली जात आहे.
---
कोट्यवधींची वीजचोरी उघड
मुलुंड : मुलुंडमध्ये महावितरणने एका औद्योगिक ग्राहकाची ४३ लाख रुपयांची वीज चोरी उघडकीस आणली. या ग्राहकाने मीटरमध्ये रिमोट कंट्रोल सर्किट बसवून वीजचोरी केली होती. मुलुंड विभागाने मागील सहा महिन्यांत तब्बल १ कोटी ८८ लाख रुपयांची वीजचोरी प्रकरणे उघडकीस आणली आहेत. महावितरणने मुलुंडमध्ये शोधून काढलेली ही मागील काही वर्षांतील वीजचोरीची सर्वात मोठी कारवाई आहे. विशेष म्हणजे या वीजचोरीमध्ये घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून मुलुंड परिसरात वीजचोरी शोधण्याची मोहीम सुरू आहे. प्रत्यक्षात वीज गळती शोधून मुलुंड उपनगरात होत असलेल्या वीज चोरीला आळा घालण्यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून महावितरण मुलुंड विभाग गेल्या काही महिन्यांपासून मुलुंडमधील विविध ठिकाणी अचानक भेटी देत आहे. या मोहिमेदरम्यान महावितरणच्या अधिकाऱ्यांनी १०६ प्रकरणांमध्ये कूण विविध वीज चोरांकडून १ कोटी ८८ लाख रपये वसूल करण्यात आले आहेत.
----
‘कोळी समाजाला न्याय देऊ’
मुलुंड ः राज्याच्या विधिमंडळात कोळी समाजाला स्थान मिळाल्यामुळे कोळी समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लागणार आहेत, असा विश्‍वास व्‍यक्‍त करत समाजाला न्‍याय हक्‍क मिळवून देणार असल्‍याचे प्रतिपादन अखिल भारतीय कोळी मंहासंघाचे अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांनी केले. ते मुलुंडमध्ये सुरू असलेल्‍या कोकण महोत्सवात बोलत होते. या महोत्‍सवाला राज्यातील सर्व दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली आहे. या वेळी मुलुंड सेवा संघाचे अध्यक्ष, माजी नगरसेवक आणि महोत्सवाचे आयोजक प्रकाश गंगाधरे यांचे त्‍यांनी कौतुक केले. या प्रसंगी गंगाधरे यांनी रमेशदादा पाटील यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार केला. महाराष्ट्रामध्ये तब्बल ९० लाखाहून अधिक कोळी बांधवांची संख्या आहे. मात्र गेली अनेक वर्षे त्यांच्या समस्येला व्यासपीठ मिळत नव्हते. मात्र आता आमदार पाटील यांच्या निवडीमुळे कोळी बांधवांचे विविध प्रश्न मार्गी लागतील, अशी व्‍यक्‍त केली गेली.
--
‘मोकळे मैदान ताब्यात घेऊ नका’
मुंबई : बीवायएल नाय चॅरिटेबल रुग्णालय संलग्न टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज कॅम्पसमधील पदवीधर वसतिगृहाजवळील मोकळ्या मैदानावर व्यायामशाळा बांधण्याची पालिकेची योजना आहे. याबद्दल कॉलेजच्या शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली असून पालिका अधिकाऱ्यांना त्याबाबत पत्र पाठवले आहे. या व्यायामशाळेमुळे नॅशनल मेडिकल कमिशनद्वारे दिलेली कॉलेजची मान्यता धोक्यात येऊ शकते, अशी भीती शिक्षकांना वाटत आहे.
पालिकेकडून मांडलेल्या प्रस्तावानुसार व्यायामशाळेसाठी १५८ चौरस मीटर एवढी जागा लागेल; तर महाविद्यालयाच्या वापरासाठी ९८ चौरस मीटर जागा शिल्लक राहील. ही व्यायामशाळा आधी दादरच्या शिवाजी पार्कात बांधली जाणार होती, पण नंतर ती मुंबई सेंट्रलस्थित कॉलेजच्या कॅम्पसमध्ये बांधण्याची योजन आखण्यात आली, असे काही शिक्षकांचे म्हणणे आहे.