एडस् दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एडस् दिन
एडस् दिन

एडस् दिन

sakal_logo
By

rat०५९.txt

(टुडे पान ३ साठी, संक्षिप्त)

कदम महाविद्यालयात जागतिक एड्स दिवस साजरा

खेड ः तालुक्यातील भरणे येथील तु. बा. कदम महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने जागतिक एड्स दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी एड्स दिनानिमित्त शपथ घेतली. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. एन. साळुंखे, एनएसएस कार्यक्रम अधिकारी आय. एस. कदम, प्रा. कांबळे, दामिनी धाडवे, स्वप्नाली दळवी व पवार आदी उपस्थित होते.


कर्टेल येथे निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण

खेड ः कर्टेल ग्रामपंचायतीतर्फे आयोजित निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण सरपंच दिनेश चव्हाण यांनी केले. प्राथमिक गटात पूर्वा कदम, आर्यन पवार अनुक्रमे प्रथम, द्वितीय, उच्च माध्यमिक गटात सिद्धी पवार, आर्या चव्हाण यांनी पहिले दोन क्रमांक, माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात स्वरा कदम, सानिका जाधव तर महाविद्यालयीन गटात भारती येलवे, रिद्धी चव्हाण यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय क्रमांक मिळवले. परीक्षण अ‍ॅड. दिलीप चव्हाण, संदीप कालेकर, संतोष चव्हाण यांनी केले. या प्रसंगी पोलिसपाटील मनोहर चव्हाण, तंटामुक्त समिती अध्यक्ष सचिन चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत चव्हाण, राजेश पवार, राधिका जाधव, तन्वी चव्हाण, प्रिया जागडे, प्राजक्ता येलवे, मुख्याध्यापक सूरसिंग ठाकरे, प्रभाकर कोळेकर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रभाकर कोळेकर यांनी केले.


जल फाउंडेशनचे कोकण रेल्वेला निवेदन

खेड ः जल फाउंडेशनच्या शिष्टमंडळाने रत्नागिरी येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक रवींद्र कांबळे यांची भेट घेत विविध समस्या मांडल्या. याशिवाय विविध एक्स्प्रेस गाड्यांना येथील स्थानकात थांबा देण्याबाबत निवेदन सादर केले. मुंबई-चिपळूण नियमित गाडी सुरू करणे, खेडसाठी मेमू सेवा सुरू करणे, गोव्यातून मुंबईकडे जाणाऱ्या सर्व गाड्यांना रत्नागिरीपासून दिलेला अपुरा आरक्षण कोटा वाढवणे, जनशताब्दी, मंगला, तेजस, गरीबरथ, कोचुवेल्ली एक्स्प्रेस, करमळी एक्स्प्रेस आदी गाड्यांना येथील स्थानकात थांबा देण्याबाबत निवेदन देण्यात आले. मांडवी एक्स्प्रेसमधील ३ द्वितीय श्रेणी आरक्षण डबे सुरू करणे, रत्नागिरी-दिवा पॅसेंजरला ४ आरक्षित डबे ठेवून पुन्हा दादरपर्यंत चालवणे, सावंतवाडी एक्स्प्रेस दादरपर्यंत चालवणे, कोकण रेल्वेच्या प्रवाशी वाहतुकीवरील ४० टक्के अधिभार काढून टाकणे आदी मागण्या करण्यात आल्या. या प्रसंगी जल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन जाधव, सल्लागार वसंत मोरे, अशोक शेलार आदी उपस्थित होते.

संविधान दिन कार्यक्रम
रत्नागिरी ः देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात आयक्युएसी विभाग, निवडणूक विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन केले. लांजा महाविद्यालयातील प्रा. मारूती पाटील यांनी सांगितले की, भारतीय राज्यघटना तयार करण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान मोलाचे आहे. भारतीय संविधान तयार करण्यास दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसांचा कालावधी लागला. या निमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी महाविद्यालय परिसराची स्वच्छता केली. घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली. यात प्रथम श्रद्धा आंब्रे, द्वितीय दिक्षा तोडणकर, तृतीय यशराज चाळके व उत्तेजनार्थ कलावती पटेद यांनी प्राप्त केला. मराठी विभागप्रमुख अनन्या धुंदूर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. प्रभारी प्राचार्या मधुरा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. संविधान दिनानिमित्त आयोजित घोषवाक्य स्पर्धा व बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या वादविवाद स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी उपप्राचार्या वसुंधरा जाधव, ऋतुजा भोवड, रिया बंडबे, राखी साळगांवकर, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. दीप्ती कदम यांनी आभार मानले.

उद्या ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रम
पावस ः सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रम आरंभासह शौर्यपदक धारक आणि वीर नारी यांचा सन्मान सोहळा बुधवारी होणार आहे. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात होणार आहे. कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पूजार, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा सैनिककल्याण अधिकारी श्रीकांत गायकवाड उपस्थित राहणार आहेत. ७ डिसेंबरला सकाळी ११ वाजाता होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी उमेश आईर यांनी केले आहे.

लांजात रोजगार व स्वयंरोजगार मेळावा

लांजा ः जागतिक अपंगदिनाचे औचित्य साधत जिल्हा परिषद व पंचायत समिती लांजा यांच्या विद्यमाने आमदार राजन साळवी यांच्या उपस्थितीत रोजगार व स्वयंरोजगार मेळावा लांजा पंचायत समितीत झाली. पंचायत समिती इमारतीमध्ये एक अपंग कक्ष देण्याचे कबूल करण्यात आले. त्या प्रसंगी तहसीलदार प्रमोद कदम, उज्ज्वला केळुस्कर, गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, बंडगर, संघटनेचे अध्यक्ष विलास गोरे, लाभार्थी अध्यक्ष गौतम कांबळे, मनोहर पावसकर, सुरेश दरडे, राजेंद्र निवळे यांच्यासह अपंग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.