दाभोळ-संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ-संक्षिप्त पट्टा
दाभोळ-संक्षिप्त पट्टा

दाभोळ-संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

rat०५१७.txt

(टुडे पान २ साठी, संक्षिप्त)

हर्णैमध्ये मच्छीमारांसाठी आरोग्य शिबिर

दाभोळ ः जेसीआय दापोली भागवत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालगाव, उपजिल्हा रुग्णालय दापोली आणि हर्णै बंदर कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने हर्णै बंदर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर झाले. या शिबिरासाठी मच्छीमारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये एचडीसीबीसी, लिपिड, थायरॉईड टेस्ट, रेनल फंक्शन टेस्ट, लिव्हर फंक्शन टेस्ट आदी प्रकारच्या चाचण्या मोफत करून मच्छीमार बांधवांमध्ये आरोग्यविषयी जनजागृती करण्यात आली. समाजातील प्रत्येक घटकांना निरोगी आरोग्य मिळावे या दृष्टिकोनातूनसुद्धा आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत जेसीआय दापोलीचे अध्यक्ष डॉ. सुयोग भागवत यांनी मार्गदर्शन केले. शिबिरासाठी जेसीआय दापोलीचे अध्यक्ष जेसी डॉ. सुयोग भागवत, डॉ. महेंद्र पाटील, बंदर कमिटीचे अध्यक्ष बाळकृष्ण पावसे, विभागीय उपाध्यक्ष जेसी अतुल गोंदकर, सचिव जेसी फराज रखांगे, जेसी समीर कदम, जेसी आशिष अमृते आदी उपस्थित होते.


श्रीया जोशी, वैभव सोमण यांची निवड

दाभोळ ः दादर-माटुंगा सांकृतिक केंद्रातर्फे आंतरमहाविद्यालयीन सुगम गीतगायन स्पर्धा दापोली तालुक्यातील जालगाव येथील श्रीराम बलवर्धक येथे झाली. दापोली केंद्रामधून श्रीया जोशी व वैभव सोमण यांची अंतिम फेरीत निवड झाली आहे. अंतिम फेरी दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रात होणार आहे. या स्पर्धेचे दापोली केंद्राचे आयोजन संस्कार भारती रत्नागिरी विभागाचे सहप्रमुख विजयानंद कोपरकर यांनी केले होते. स्पर्धेसाठी परीक्षण सुहास गोडबोले आणि प्रियांका दाबके बापट यांनी केले. स्पर्धेसाठी संगीतसाथ निलकंठ गोखले, संवादिनी व तबलासाथ चैतन्य गोडबोले यांनी केली.