पक्षांनी काढलय अंग, सर्वत्र गाव पॅनेलचा चंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पक्षांनी काढलय अंग, सर्वत्र गाव पॅनेलचा चंग
पक्षांनी काढलय अंग, सर्वत्र गाव पॅनेलचा चंग

पक्षांनी काढलय अंग, सर्वत्र गाव पॅनेलचा चंग

sakal_logo
By

rat०५२४.txt

(टुडे पान २ साठी) अँकर

पक्षांनी काढलय अंग, सर्वत्र गाव पॅनेलचा चंग

राजकीय पक्ष दूर ; तुमचं तुम्ही बघाचा सूर
सकाळ वृत्तसेवा ः
चिपळूण, ता. ५ : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावपातळीवर वातावरण पूर्णत: ढवळून निघायला सुरवात झाली आहे. मात्र या निवडणुकीचा धुरळा उडण्याआधीच राजकीय पक्षांनी अंग काढण्यास सुरुवात केली आहे. आता तुम्ही तुमचे गावपातळीवर बघा, अशी भूमिका पक्ष व राजकीय नेत्यांनी घेतली आहे. तेव्हा ग्रामस्थांनीही शहाणे होत बिनविरोधचा चंग बांधण्यास सुरुवात केली आहे. मुळातच पैशांची वारेमाप उधळपट्टी टाळण्यासाठी व गावविकासाला चालना मिळण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूका बिनविरोधची गरज व्यक्त होत आहे.
सध्या तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. भर हिवाळ्यात या गावांत वातावरण तापल्याचे चित्र आहे. लोकशाही प्रक्रियेत सर्वाधिक चुरशीची निवडणूक म्हणून ग्रामपंचायतींची निवडणूक लढली जाते. त्यामुळे या निवडणुकीत गटा-तटाचे राजकारण हे होतेच होते. त्यात एखाद्या गावात राजकीय हस्तक्षेप असेल तर फोडाफोडीलाही वेगळेच महत्त्व प्राप्त होते. परंतु यावेळच्या निवडणुकीत एकाही राजकीय पक्षाने थेट निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतलेला नाही. उलट तुमचे तुम्ही गाव पातळीवर बघा, असा सल्ला देत असल्याने सर्व जबाबदारी ग्रामस्थांवर येऊन पडू लागली आहे. अगदी राष्ट्रवादी, शिवसेना व शिंदे गटानेही हीच भूमिका घेतली असल्याने गाव पुढाऱ्यांमध्येच निवडणुकीचा ज्वर टोकावर पोहोचू लागला आहे. मात्र त्यातही काहींनी बिनविरोधसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. काही ठिकाणी दोनपेक्षा अधिक गट-तट एकत्र येऊन वेगवेगळ्या जोडण्या लावण्याचे काम करीत आहेत.


निवडणुकीनंतर ''सरपंच'' आमचा

ग्रामपंचायत निवडणुकीतही भाजपा आणि शिंदे गट विरुद्ध महाविकासआघाडी असा विचार केला जाईल, असे सुरवातीला वाटले होते. मात्र एकाही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राजकीय पक्षांनी अजून तरी ''एण्ट्री'' घेतलेली दिसत नाही. परंतु निवडणुकीनंतर अमूक ग्रामपंचायत व सरपंच आमच्या पक्षाचे म्हणून दावा करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.