राज्य सरकारच्या २४ सुट्ट्या जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्य सरकारच्या २४ सुट्ट्या जाहीर
राज्य सरकारच्या २४ सुट्ट्या जाहीर

राज्य सरकारच्या २४ सुट्ट्या जाहीर

sakal_logo
By

राज्य सरकारच्या २४ सुट्ट्या जाहीर
कणकवली, ता. ५ ः राज्य शासनाच्या वतीने विविध सन आणि उत्सव तसेच महापुरषांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शासकीय सुट्ट्या जाहीर झाल्या आहेत. येत्या २०२३ या वर्षात २४ सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. यातील पहिली शासकीय सुट्टी २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनी सुरू होत आहे. महाशिवरात्र १८ फेब्रुवारी शनिवार, छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारी रविवार आहे. होळी ७ मार्च मंगळवार, गुढीपाडवा २२ मार्च बुधवार, रामनवमी २३ मार्च गुरुवार, महावीर जयंती ४ एप्रिल मंगळवार, गुड फ्रायडे ७ एप्रिल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल शुक्रवार, रमजान ईद २२ एप्रिल शनिवारी सुट्टी आहे. महाराष्ट्र दिन एक मे सोमवार, बुद्ध जयंती पाच मे शुक्रवार, बकरी ईद २८ जून बुधवार, मोहरम २९ जुलै शनिवारी आहे. स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट मंगळवार, पारशी नववर्ष १६ ऑगस्ट बुधवार, गणेश चतुर्थी १९ सप्टेंबर मंगळवार, ईद-ए-मिलाद २८ सप्टेंबर गुरुवारी आहे. महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबर सोमवार, दसरा २४ ऑक्टोबर मंगळवारी आहे. दिवाळी लक्ष्मीपूजन १२ नोव्हेंबर रविवार, दिवाळी बलीप्रतिपदा १४ नोव्हेंबर मंगळवार, गुरुनानक जयंती २७ नोव्हेंबर सोमवार तर ख्रिसमस २५ डिसेंबर सोमवारी अशा सुमारे २४ राज्य शासनाच्या सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.