
एसटीसेवा अपुरी, वडापही महिनाभर बंद
rat०५२०.txt
(टुडे पान २ साठी मेन)
(टीप- यापूर्वी शिलकीतील मेन टुडे २ साठी घ्यायला सांगितली होती, पण ती खाली घेऊन ही बातमी मेन करावी.)
एसटीसेवा अपुरी, वडापही महिनाभर बंद
हर्णै, आंजर्लेवासीयांचे हाल ; खासगी व परवानाधारक चालकांमधील वाद
सकाळ वृत्तसेवा ः
हर्णै, ता. ५ ः सक्षम सेवा देण्यात अपुरी ठरणारी एसटी महामंडळाची सुविधा आणि महामंडळाची उणीव भरून काढण्यासाठी सक्षम असलेली परवानाधारक व खासगी प्रवाशी वाहतूक सेवा यांच्यातील वादामुळे दापोली ते हर्णै आंजर्लेपर्यंतची ही वडाप वाहतूक सेवा सध्या महिनाभर बंद आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची प्रचंड गैरसोय होऊन अतोनात हाल होत आहेत.
वाढत्या प्रवाशीवर्गाला सक्षम सेवा देण्यात कायमच अपुरी ठरलेल्या एसटी महामंडळाची उणीव परवानाधारक व खासगी प्रवाशी वाहने पूर्ण करत असल्याचे चित्र सर्वत्रच दिसत आहे. दापोली तालुक्यातील हर्णै, पाजपंढरी, अडखळ मार्गावरही मोठी वर्दळ असणाऱ्या गावांना एसटीसोबत ही वाहतूक व्यवस्था प्रवाशांची योग्य व्यवस्था करून दिलासा देत आहे; मात्र गेल्या महिन्यापासूनच या मार्गावरील ही वाहतूक करणाऱ्या खासगी व परवानाधारक वाहनचालकांमध्ये वाद निर्माण झाला आहे. त्यामुळेच गेले महिनाभर ही वाहतूक सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्याने या मार्गावरील प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.
हर्णै हे तालुक्यातील मच्छीमारी बंदर असल्यामुळे दापोली हर्णै-पाजपंढरी या मार्गावर कायम वर्दळ असते. त्यामुळे एसटी महामंडळाच्या गाड्यांची संख्या येथील प्रवाशी वर्गासाठी अपुरी ठरते. त्यामुळेच या मार्गावर गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या खासगी व परवानाधारक वाहनांनी सुरू केलेल्या सेवेला प्रचंड प्रतिसाद मिळला आहे. त्यातच दर १० मिनिटांनी हे प्रवासीवाहन सोडण्याची पद्धत असल्यामुळे येथील नागरिकांना तालुक्याची कामे आटोपून त्वरित आपल्या व्यवसायाकडे परतण्यासाठी मोठी मदत होते. परिणामी, येथील हा प्रवासी वाहतूक व्यवसाय मोठ्या प्रमाणात बहरला होता. गेली अनेक वर्षे या मार्गावर विनातक्रार ही सेवा सुरळीत चालू होती; मात्र दापोलीतील इतर सर्व मार्गावरील सेवा सुरू असताना महिनाभरापासून दापोली ते हर्णै आंजर्लेपर्यंतच्या मार्गावरीलच सेवा अचानक बंद ठेवण्यात आल्याने येथील नागरिकांचे वेळेचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे.
अधिकारी, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
दापोली-हर्णै मार्गावरील एसटीच्या गाड्यांची संख्या मोठी असली तरी या मार्गावरील वाढत्या प्रवासीसंख्येपुढे ही सेवा अपुरी ठरत आहे. परिणामी, दापोली-हर्णै मार्गावरील एसटीला पर्याय ठरत असलेली ही सेवा आजच्या काळात आवश्यक बाब बनली आहे. त्यामुळे या सेवेतील त्रुटी दूर करण्यासाठी तालुक्यातील संबंधित अधिकारीवर्ग व येथील लोकप्रतिनिधींनी प्राधान्याने येथे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत प्रवाशीवर्ग व्यक्त करत आहे.