नाचणी पिकाच्या लागवडीतून आर्थिक फायदा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाचणी पिकाच्या लागवडीतून आर्थिक फायदा
नाचणी पिकाच्या लागवडीतून आर्थिक फायदा

नाचणी पिकाच्या लागवडीतून आर्थिक फायदा

sakal_logo
By

rat०५३०.txt

बातमी क्र. ३० (टुडे पान २ साठी)

फोटो ओळी
-rat५p१३.jpg-
६६६१४
रत्नागिरी ः कोंडगाव कशेळी येथे ''एक दिवस माझ्या बळीराजासाठी'' या उपक्रमांतर्गत बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधताना उपविभागीय कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे. सोबत कृषी विभागाचे कर्मचारी व शेतकरी.

नाचणी पिकाच्या लागवडीतून आर्थिक फायदा

भाग्यश्री नाईकनवरे ; एक दिवस बळीराजासाठी
सकाळ वृत्तसेवा ः
रत्नागिरी, ता. ५ ः २०२३ वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे होणार आहे. त्या अनुषंगाने कोकणातील नाचणी पिकाचे आहारातील पोषक महत्व मोठ्या प्रमाणात असल्याने रब्बी उन्हाळी हंगामामध्ये नाचणी पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केल्यास आर्थिक फायदा होण्यास मदत होईल. यासाठी कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात असल्याची माहिती उपविभागीय कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी कोंडगाव-कशेळी येथे केले.
''एक दिवस माझ्या बळीराजासाठी'' या उपक्रमांतर्गत उपविभागीय कृषी अधिकारी नाईकनवरे यांनी तालुक्यातील कोंडगाव-कशेळी येथे शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन संवाद साधला. त्यांच्या कृषी आणि त्या अनुषंगाने अडचणी, समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, फळपीक विमा योजनेबाबत मार्गदर्शन केले. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन योजनेबाबत माहिती दिली. गावातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने केले.
या वेळी मंडळ कृषी अधिकारी जयेश काळोखे यांनी स्व. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, आंबा फळमाशी नियंत्रणसाठी कमी खर्चात रक्षक सापळा बनवणे व त्याचा वापर याबाबत मार्गदर्शन केले. कृषी सहाय्यक रघुनाथ डवरी यांनी कृषी यांत्रिकीकारण योजनेची माहिती दिली. कृषी सहाय्यक सुनील कुरंगळ यांनी काजू फळपीक व्यवस्थापन, मग्रारोहयो फळबाग लागवड, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेबाबत मार्गदर्शन केले. रब्बी हंगाम मिश्र भाजीपाला प्रात्यक्षिक बियाणे शेतकऱ्यांना वितरित केले. सरपंच दीपक बावकर, पोलिस पाटील प्रकाश बावकर, कृषी सहाय्यक सुषमा कदम आणि शेतकरी उपस्थित होते. दत्ताराम ताम्हणकर यांचे मसूर पिकाचे प्रक्षेत्र, प्रकाश बावकर यांचे भाजीपाला लागवड प्रक्षेत्राची पाहणी केली. खानू येथे प्रगतशील शेतकरी गुंडू पाटील यांचे भाजीपाला, काजू, पेरू प्रक्षेत्रास भेट देऊन पाहणी केली.