''कोकण कला''तर्फे सावंतवाडीत एडस् दिनानिमित्त जनजागृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''कोकण कला''तर्फे सावंतवाडीत एडस् दिनानिमित्त जनजागृती
''कोकण कला''तर्फे सावंतवाडीत एडस् दिनानिमित्त जनजागृती

''कोकण कला''तर्फे सावंतवाडीत एडस् दिनानिमित्त जनजागृती

sakal_logo
By

swt54.jpg
66628
सावंतवाडीः येथे पथनाट्य सादर करताना विद्यार्थी.

‘कोकण कला’तर्फे सावंतवाडीत
एडस् दिनानिमित्त जनजागृती
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ५ः कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्यावतीने श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी यांच्या सहकार्याने जागतिक एडस् दिनानिमित्त जनजागृतीसाठी प्रभात फेरीचे आयोजन केले होते. सावंतवाडी गांधीचौक येथे एडस् या विषयावर पंचम खेमराज महाविद्यालयातील युवक-युवतींनी पथनाट्य सादर करून जनजागृती केली. यांनतर महाविद्यालयात शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी शिबिराच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांची रक्त तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमात सुनील सोन्सुरकर यांनी एडस् दिनानिमित्त उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्यावतीने प्रकल्प व्यवस्थापक अजिंक्य शिंदे, अवंती गवस, कुणाल चव्हाण, प्रथमेश सावंत, प्रदीप पवार, जयराम जाधव तसेच महाविद्यालयाच्या वतीने एनएसएस विभागाचे डॉ. देविदास बोर्डे, एनसीसी विभागाचे डॉ. सचिन देशमुख, प्रा. सुनयना जाधव, प्रा. आर. एम. जाधव, प्रा. एम. व्ही. आठवले तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमास सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय आयसीटीसी विभागाचे समुपदेशक सोन्सुरकर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अमित लिंगवत, शलाका नाईक, वैभवी बांदेकर यांचे विशेष सहकार्य लाभले.