असलदे रामेश्वर मंदिरात हरिनाम सप्ताह उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

असलदे रामेश्वर मंदिरात हरिनाम सप्ताह उत्साहात
असलदे रामेश्वर मंदिरात हरिनाम सप्ताह उत्साहात

असलदे रामेश्वर मंदिरात हरिनाम सप्ताह उत्साहात

sakal_logo
By

swt57.jpg
L66636
असलदेः हरिनाम सप्ताहानिमित्त ‘श्री''चरणी’ श्रीफळ अर्पण करण्यात आले.

असलदे हरिनाम सप्ताह उत्साहात
नांदगावः ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ अशा विविध पारंपरिक अभंग, जयघोषात हरिनाम सप्ताहानिमित्त असलदे परिसर न्हाऊन निघाला. असलदे गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात झाला. सकाळपासूनच असलदे चव्हाटा येथे घटस्थापना, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते. गावठण येथील चव्हाट्यावर दरवर्षीप्रमाणे हरिनाम सप्ताह आयोजित केला आहे. त्यानिमित्त सकाळी घटस्थापना, वारकरी भजन, दुपारी ग्रामस्थ व माहेरवाशिणींचा ग्रामदैवताची ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी माहेरवाशीण महिलांची मोठी रांग लागली होती. सर्वांनी मनोभावे रामेश्वर चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले. रात्री वारकरी सांप्रदायिक मंडळ शिरगाव यांचे दिंडी भजन, पंचक्रोशीतील वारकरी भजनांनी परिसर टाळ, मृदुंगाच्या गजरात दणाणून गेला. भाविकांनी दर्शनसाठी गर्दी केली होती. सप्ताहानिमित्त चव्हाटा परिसर विद्युत रोषणाईने उजळून गेला होता.
............
swt58.jpg
66637
सावंतवाडीः भटवाडी रस्त्यावरील ढिगारा बाजूला करण्यात आला.

भटवाडीतील ‘तो’ ढिगारा हटविला
सावंतवाडीः शहरातील भटवाडी येथे लक्ष्मीनारायण मंदिरच्या समोरील रस्त्याच्या मधोमध कित्येक दिवसांपासून असलेला दगड व मातीचा उंच ढिगारा अपघाताला कारणीभूत ठरत होता. अखेर ‘सामाजिक बांधिलकी’च्यावतीने तेथील दगड व माती बाजूला करून सपाटीकरण करण्यात आले. रस्त्यामधोमध असलेला तो ढिगारा वाहनांसाठी विशेषतः दुचाकीस्वारांसाठी धोकादायक ठरत होता. याची दखल घेऊन ''सामाजिक बांधिलकी''चे कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक संजय पेडणेकर, श्याम हळदणकर व रवी जाधव यांनी पुढाकार घेऊन तो ढिगारा पूर्णतः बाजूला करून रस्ता मोकळा केला. या जनसेवेचे तेथील रहिवाशांकडून कौतुक होत आहे,
................