
कवठी पोलिस पाटलाविरोधात ग्रामस्थांचे पोलिसांना निवेदन
swt511.jpg
66650
निवतीः कवठी पोलिस पाटलाच्या कार्यपद्धती विरोधात ग्रामस्थांनी पोलिसांत धाव घेतली.
कवठी पोलिस पाटलाविरोधात
ग्रामस्थांचे पोलिसांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ५ः कवठी पोलिस पाटलाच्या कार्यपद्धती विरोधात ग्रामस्थांनी निवती पोलिसात धाव घेत चौकशीची मागणी केली आहे. तसेच त्यांच्याकडून ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेतील जबाबदारी काढून घ्यावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली असून चौकशी करण्याची ग्वाही पोलिसांनी दिल्याची माहिती शिवसेना नेते अतुल बंगे यांनी दिली.
गाव कामगार म्हणून पोलिस पाटलाची नियुक्ती असते; मात्र शांतता राखण्याऐवजी ते गावातील वातावरण कलुषित करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. पोलिस पाटील आपल्या पदाचा गैरवापर करत असल्याने त्यांची चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. संबंधित पोलिस पाटील दाखले सुद्धा वेळेत देत नाही, अशी तक्रार करत त्यांना योग्य तो समज द्यावा. राजकारणामुळे वातावरण कलुषित होऊ देऊ नये, अशी मागणी कवठी ग्रामस्थांनी शनिवारी निवेदनाद्वारे केली. यावेळी सरपंच रुपेश वाड्येकर, माजी उपसरपंच परुळेकर, नंदा वाड्येकर, मंगेश बांदेकर, मंदार खडपकर, गोपाळ कवटकर आदी उपस्थित होते.