कबड्डी स्पर्धेत ''कासार्डे''चे वर्चस्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कबड्डी स्पर्धेत ''कासार्डे''चे वर्चस्व
कबड्डी स्पर्धेत ''कासार्डे''चे वर्चस्व

कबड्डी स्पर्धेत ''कासार्डे''चे वर्चस्व

sakal_logo
By

swt५१०.jpg
६६६४९
फोंटाघाटः कबड्डी स्पर्धेत विजेत्या कासार्डे हायस्कूल मुलींच्या संघासह मान्यवर.

कबड्डी स्पर्धेत ‘कासार्डे’चे वर्चस्व
तालुकास्तरीय स्पर्धा ः मुला-मुलींचा संघ जिल्हास्तरावर
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ५ : न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट येथील पार पडलेल्या शालेय कणकवली तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या १४ वर्षांखालील मुलांच्या आणि मुलींच्या संघाने अजिंक्यपद पटकावले. त्यांची ओरोस येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तर १९ वर्षांखालील मुलांच्या संघ उपविजेता ठरला.
यशस्वी खेळाडूंना पूजा पाताडे, यशवंत परब, अनिल जमदाडे यांच्यासह क्रीडाशिक्षक दत्तात्रय मारकड, रजनी कासार्डेकर, ऋषिकेश खटावकर, नवनाथ कानकेकर, वैष्णवी डंबे यांचे मार्गदर्शन लाभले. १४ वर्षा खालील मुलांच्या संघात कप्तान अभिषेक आडेसह सुमित राठोड, चेतन पवार, परशुराम राठोड, मनोज जाधव, प्रणय पवार, गौरेश शिंदे, भूपेश सुतार, अर्शद हुलिकेरी, प्रथमेश पवार, तेजस आईर आदी, तर १४ वर्षांखालील मुलींच्या संघात नेहा पन्हाळकर (कर्णधार), नंदिनी चव्हाण, लक्ष्मी पवार, आश्विनी चव्हाण, दीक्षा पाताडे, भार्गवी खानविलकर, ऋती मिसळ, जान्हवी रणम, काजल चव्हाण, प्रगती निकम, मयुरी दळवी आदी खेळाडूंचा समावेश आहे. या स्पर्धेत कासार्डे ज्युनिअर कॉलेजचा १९ वर्षांखालील मुलांचा संघही उपविजेता ठरला. या संघास शिक्षक यशवंत परब, पूजा पाताडे, अनिल जमदाडे यांच्यासह विद्यालयाचे क्रीडाशिक्षक मारकड, कासार्डेकर, कानकेकर, डंबे, खटावकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सर्व यशस्वी खेळाडूंचे कासार्डे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष परशुराम माईणकर, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर, स्कूल कमिटी चेअरमन अरविंद कुडतरकर व सर्व पदाधिकारी, प्राचार्य एम. डी. खाड्ये, पर्यवेक्षक एन. सी. कुचेकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.