
मालवणातून वृध्द बेपत्ता
66666
टीपः swt514.jpg मध्ये फोटो आहे.
मालवणातून
एक जण बेपत्ता
मालवण : शहरातील मेढा येथील रहिवासी फ्रान्सिस सालू फर्नांडिस (वय ५७) हे एक डिसेंबरपासून बेपत्ता असल्याची फिर्याद त्यांची पत्नी बितोज फर्नांडिस यांनी येथील पोलिस ठाण्यात दिली. फ्रान्सिस फर्नांडिस यांची मानसिक स्थिती चांगली नसल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एक डिसेंबरला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चहा पिल्यानंतर ते घरातून निघून गेले. बाहेर जाण्याची त्यांना सवय असल्याने कुटुंबीयांनी ते परत येतील या विचाराने शोध घेतला नाही; मात्र बराच वेळ ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता ते सापडले नाहीत. त्यामुळे ते बेपत्ता झाल्याची फिर्याद त्यांची पत्नी बितोज फर्नांडिस यांनी पोलिस ठाण्यात दिली आहे. बेपत्ता फ्रान्सिस यांचा रंग काळा-सावळा असून अंगावर निळसर पट्टा असलेले टीशर्ट व काळी हाफ पॅन्ट आहे. याबाबत अधिक तपास पोलिस कर्मचारी पी. जी. मोरे करत आहेत.