
फोटोसंक्षिप्त-अरविंद मोंडकर यांचा मालवण येथे सत्कार
66686
टीपः swt518.jpg मध्ये फोटो आहे.
अरविंद मोंडकर यांचा
मालवण येथे सत्कार
मालवण, ता. 5 : सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल अरविंद मोंडकर यांचा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क मंत्री, माजी गृहमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या निर्देशनानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव जिल्हा प्रभारी शशांक बावचकर व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी जिल्हा काँग्रेस बैठकीत पत्र देऊन सत्कार केला. या निवडीवरून मोंडकर यांच्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला चांगली संधी दिल्याबद्दल व तालुका काँग्रेसचाही योग्य तो सन्मान झाल्याने तालुकाध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक मेघनाद धुरी यांनी प्रांतिक सदस्य चव्हाण यांच्या हस्ते अरविंद मोंडकर यांचा सत्कार केला. यावेळी महिला तालुकाध्यक्ष ममता तळगावकर, शहराध्यक्षा गीता नेवाळे, युवक काँग्रेसचे योगेश्वर कुर्ले, सामाजिक कार्यकर्त्या विद्या फर्नांडिस, आबा मसुरकर आदी उपस्थित होते.
66687
साळेल सरपंचपदी
साळकर बिनविरोध
मालवण, ता. 5 : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये ठाकरे गट शिवसेनेला गावागावांतून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेनेचे उमेदवार लढत देत असून त्यांना नक्कीच यश मिळेल, असा विश्वास शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला. त्यांच्या उपस्थितीत साळेल ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये साळेल गावच्या सरपंचपदी रवींद्र साळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. साळकर यांचे शिवसेनेच्यावतीने खासदार राऊत, आमदार वैभव नाईक यांनी अभिनंदन केले. शिवसेना संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, संग्राम प्रभुगावकर, हरी खोबरेकर, मंदार केणी, जान्हवी सावंत आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.