व्हेंटिलेशनअभावी उमेदवार घामाघूम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्हेंटिलेशनअभावी उमेदवार घामाघूम
व्हेंटिलेशनअभावी उमेदवार घामाघूम

व्हेंटिलेशनअभावी उमेदवार घामाघूम

sakal_logo
By

swt521.jpg
66698
सावंतवाडीः जिमखाना मैदानावरील बाळासाहेब प्रबोधिनी केंद्रात झालेली गर्दी.

व्हेंटिलेशनअभावी उमेदवार घामाघूम
सावंतवाडीतील प्रकारः तहसीलदारांकडे लक्ष देण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ ः तालुक्यातील ५२ ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांचे अर्ज भरणे, छाननी करणे यासाठी जिमखाना मैदानावरील बाळासाहेब प्रबोधिनी केंद्रात ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, या केंद्रात व्हेंटिलेशन नसल्यामुळे त्या ठिकाणी आलेले उमेदवार आणि पदाधिकारी निवडणुकीपूर्वीच घामाघुम झाल्याचे दिसून आले होते. याबाबत निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसीलदारांनी तात्काळ लक्ष द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
येथील जिमखाना मैदानावरील बाळासाहेब प्रबोधिनी केंद्रात ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार अर्ज छाननी, अर्ज भरणे प्रक्रिया सुरु आहे. एकाच वेळी अनेक ग्रामपंचायतीचे उमेदवार बोलविले जात असल्यामुळे त्या केंद्रात आज गर्दी निर्माण झाली होती. मात्र, या केंद्रात व्हेंटिलेशन नसल्यामुळे त्या ठिकाणी आलेले उमेदवार गरम होत असल्याने त्रस्त झाले होते. त्यामुळे उमेदवार आणि राजकीय पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी नाराजी व्यक्त केली. यापुढे अशी समस्या निर्माण होणार नाही, यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तसेच तहसीलदारांनी योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत तहसीलदार श्रीधर पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, "सर्व लोक मावतील अशी जागा शहरात नाही. पालिकेच्या बॅ नाथ पै सभागृहात हे केंद्र घ्यायचे होते. परंतु, त्या ठिकाणी काम सुरू असल्यामुळे अन्य पर्यायाचा स्वीकार करावा लागला. तुर्तास पार्कींगचे प्रश्न सुटेल, अशी आमच्याकडे जागा नाही. त्यामुळे याच ठिकाणी पुढे काही तरी पर्याय काढण्यात येणार आहे."