कृष्णा गावडे यांचा प्रामाणिकपणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृष्णा गावडे यांचा प्रामाणिकपणा
कृष्णा गावडे यांचा प्रामाणिकपणा

कृष्णा गावडे यांचा प्रामाणिकपणा

sakal_logo
By

swt५२५.jpg
६६७२०
कारीवडेः रोशन गावडे यांच्याकडे पाकीट सुपूर्त करताना बंटी गावडे.

कृष्णा गावडे यांचा प्रामाणिकपणा
सावंतवाडी, ता. ५ः कारीवडे येथील सुरभी हॉटेल परिसरात आढळून आलेले पैशाचे पाकीट कृष्णा उर्फ बंटी गावडे या युवकाने मूळ मालकाला परत केले. ही घटना तीन नोव्हेंबरला रात्री उशिरा घडली होती. कृष्णा गावडे यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल मूळ मालक रोशन गावडे यांनी त्यांचे आभार मानले. रोशन गावडे हे कोल्हापूर येथून सावंतवाडीच्या दिशेने येत असताना हॉटेल सुरभी परिसरात जेवणासाठी थांबले होते. यावेळी अनावधानाने त्यांच्या खिशातील पैशाचे पाकीट पडले. घरी आल्यानंतर आपले पाकीट गहाळ झाल्याची कल्पना त्यांना झाली. यावेळी शोधाशोध सुरू असतानाच कृष्णा गावडे या युवकाचा त्यांना कॉल आला. पाकिटातील ओळखपत्राच्या आधारे त्यांनी हा संपर्क साधला. त्यानंतर तुमचे पाकीट आमच्याकडे आहे. ते आमच्या हॉटेलमध्ये येऊन घेऊन जा, असे त्याने सांगितले. त्यानुसार गावडे यांनी काल त्या ठिकाणी जाऊन आपले पाकीट ताब्यात घेतले व त्यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल आभार मानले.
....................
पाटथरला उद्या दत्तजयंती उत्सव
देवगड, ता. ५ ः तालुक्यातील पाटथर सडा येथील स्वामी गगनगिरी महाराज आश्रमात बुधवारी (ता.७) दत्तजयंती उत्सवाचे आयोजन केले आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या सर्व कार्यक्रमांचा तसेच महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन आश्रम व्यवस्थापकांनी केले आहे. कार्यक्रम असे, पहाटे ५.३० वाजता - काकड आरती, नामस्मरण, सकाळी ७ ते ९ - पादुका अभिषेक, १० ते १२ - दत्तगगनगिरी यज्ञ, दुपारी १ ते ३ - महाप्रसाद, दुपारी ३ ते ४ - हरिपाठ - पायीवारी वारकरी सांप्रदाय कोकण दिंडी, ४ ते ६ - योगिता पवार (ओरोस) यांचे किर्तन, सायंकाळी ६ ते ७ - दत्तजन्मोत्सव, ७ ते ८ - पालखी प्रदक्षिणा, महाप्रसाद रात्री ८ वाजल्यापासून विविध भजने आणि ढोलवादन.