रत्नागिरी-एकही धाव न देता घेतले नऊ बळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-एकही धाव न देता घेतले नऊ बळी
रत्नागिरी-एकही धाव न देता घेतले नऊ बळी

रत्नागिरी-एकही धाव न देता घेतले नऊ बळी

sakal_logo
By

- rat५p२४.jpg-KOP२२L६६६७३ अविराज गावडे
----------
एकही धाव न देता घेतले नऊ बळी
आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा ; रत्नागिरीच्या अविराज गावडेचा विक्रम
रत्नागिरी, ता. ५ ः पुणे येथील आंतरमहाविद्यालय क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरीच्या अविराजने गावडे याने एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट लोणी या महाविद्यालयाविरुद्ध सामन्यात दोन षटकात एकही धाव न देता नऊ विकेट घेत नव्या विक्रमाला गवसणी घातली.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १६ वर्षाखालील लीग स्पर्धेत सुमारे ८१ बळी मिळवून त्याने रेकॉर्ड प्रस्थापित केले आहे. यापूर्वी हे रेकॉर्ड ५६ बळींचे होते. अविराजने ते पार करत नवनवे विक्रम स्थापित केले आहेत. या व्यतिरिक्त विविध क्रिकेट स्पर्धांमध्ये ऑलराउंडर कामगिरी करत अविराजने साऱ्यांची मने जिंकून घेतली. त्याने केलेल्या कामगिरीची दखल घेऊन, त्याची अंडर ---वर्षाखालील गटात भारताच्या पश्चिम विभाग क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली होती. सध्या पुणे येथे आंतर महाविद्यालय क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत. अविराज गावडे हा राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज लांडेवाडी, भोसरी पुणे या महाविद्यालयाच्या संघातून खेळत आहे.
या स्पर्धेतील एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट महाविद्यालयाविरुद्ध झालेल्या सामन्यात अविराजने दोन षटकांत एकही धाव न देता नऊ बळी घेण्याची कामगिरी नोंदवली आहे. ही कामगिरी करत अविराजने स्वतःचा विक्रम मोडत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. तत्पूर्वी आयआयटी हिंजवाडी महाविद्यालयविरुद्ध सामन्यातही अविराजने दोन षटकांत चार धावा देत ७ बळी घेतले होते.